नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियासारख्या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी खूप सारे प्लान ऑफर करीत आहेत. परंतु, सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल सुद्धा यात मागे नाही. बीएसएनएल खासगी कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहे. आज आम्ही तुम्हाला च्या अशा एका प्लान संबंधी माहिती देत आहोत. ज्या प्लानची किंमत फक्त ९७ रुपये असून यात रोज २ जीबी डेटा आणि कॉलिंग सारखी सुविधा देत आहे. वाचाः BSNLचा ९७ रुपयांचा प्लान १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारा बीएसएनएलचा हा प्रसिद्ध प्रीपेड प्लान आहे. ९७ रुपयांत ग्राहकांना १८ दिवसांची वैधता मिळते. यात ग्राहकांना रोज २ जीबी डेटा मिळतो. याप्रमाणे एकूण ३६ जीबी डेटाची सुविधा दिली जाते. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० SMS दिले जाते. याशिवाय, लोकधून अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः बाकीच्या कंपन्या काय ऑफर करतात रिलायन्स जिओ या किंमतीत ९८ रुपयांचा प्रीपेड प्लान ऑफर करते. जिओच्या या प्लानमध्ये १४ दिवसांची वैधता सोबत रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे युजर्संना एकूण २१ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. एअरटेलकडे ९८ रुपयांचा प्लान आहे. ज्यात फक्त १२ जीबी डेटा मिळतो. यात कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा दिली जात नाही. या वैधता सुद्धा अॅक्टिव प्लानवर अवलंबून आहे. वाचाः वोडाफोन आयडियाकडे ९९ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. यात १८ दिवसांची वैधता मिळते. एकूण १ जीबी डेटा दिला जातो. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. प्लानमध्ये SMS ची सुविधा नाही. त्यामुळे या प्लानच्या तुलनेत सर्वात जास्त बेनिफिट्स BSNL देत आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36ZS4aO
Comments
Post a Comment