नवी दिल्लीः सेल सोमवार पासून सुरू झाला आहे. आज या सेलचा अखेरचा दिवस आहे. प्रत्येक वर्षी आयोजित केला जाणारा हा सेल दोन दिवसांसाठी असतो. या सेलमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर वेगवेगळा डिस्काउंट्स मिळतो. जर तुम्हाला कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी खास माहिती देत आहोत. या फोन्सची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. वाचाः Realme C11 2021 रियलमीच्या या स्मार्टफोनला अॅमेझॉन प्राइम डे २०२१ सेल मध्ये ६ हजार ६९९ रुपयात खरेद करू शकता. या फोनला तुम्ही जुन्या फोनच्या बदल्यात ६३५० रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. वाचाः Samsung Galaxy M11 सॅमसंगच्या या स्मार्टफोनला स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. या फोनची किंमत सध्या ९ हजार ९९९ रुपये आहे. या फोन मध्ये स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर, ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. हँडसेट मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः Redmi 9 Prime रेडमीच्या या स्मार्टफोनला ९ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीत या सेलमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर आणि क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर दिला आहे. ही किंमत ४ जीब रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजची आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. फोनमध्ये 5020mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः Tecno Spark 7 टेक्नो स्पार्क ७ ला यावर्षी लाँच करण्यात आले होते. याची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे. ही किंमत ३ जीबी रॅम व्हेरियंटची आहे. या सेलसाठी अॅमेझॉनने एचडीएफसी बँकेसोबत पार्टनरशीप केली आहे. जर तुम्ही HDFC बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड व ईएमआयचा ट्रान्झॅक्शन केले तर तुम्हाला फ्लॅट डिस्काउंट १० टक्के मिळेल. तसेच एक्सचेंज, नो कॉस्ट ईएमआय ऑफर दिली जात आहे. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i6kV3F
Comments
Post a Comment