जबरदस्त! पडल्यावरही येणार नाही स्क्रॅच, आयफोन १४ मध्ये मिळणार ‘ही’ खास बॉडी

नवी दिल्ली : दिग्गज टेक कंपनी यावर्षी सीरिज लाँच करणार आहे. फोनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार, याबाबत कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही. लाँचिंगनंतरच या सीरिजच्या फीचर्सबद्दल माहिती मिळेल. अ‍ॅपलचा नेहमीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न असतो. मात्र, अद्याप आयफोन १३ सीरिज लाँच झाली नसली तरी त्या आधीच सीरिजबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. टिपस्टरने या सीरिजबाबत काही खुलासे केले आहे. आधीच्या आयफोनच्या तुलनेत हे मॉडेल अधिक मजबूत असतील असे सांगितले जात आहे. २०२२ मध्ये हे मॉडेल लाँच होऊ शकतात. वाचा: एका रिपोर्टनुसार, आयफोन १४ सीरिजचे प्रो मॉडेल टायटेनियम बॉडीसोबत लाँच होऊ शकतात. पहिल्यांदाच अशाच प्रकारची बॉडी आयफोनमध्ये मिळू शकते. याआधी आयफोनमध्ये अ‍ॅल्यूमिनियम आणि स्टेनलेस स्टीलचा वापर केला जात असे. टायटॅनिममुळे स्क्रॅच येत नाही व हे स्टेनलेस स्टीलच्या तुलनेत हलका असेल. म्हणजेच, आयफोन खूपच हलका असेल व यावर स्क्रॅच देखील येणार नाही. मात्र, टायटॅनियमवर बोटांचे ठसे लवकरच उमटतात. यावर उपाय म्हणून आयफोन ऑक्साइड कोटिंगचा वापर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे Apple आधीपासूनच आपल्या स्मार्ट वॉचसाठी टायटेनियमचा उपयोग करत आहे. वाचा: अन्य काही रिपोर्टनुसार, , मॅक आणि आयफोन एसईसह सर्व डिव्हाइससाठी फेस आयडी आणण्याची अ‍ॅपलची योजना आहे. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xgfZhe

Comments

clue frame