एलजीने सादर केले दमदार इयरबड्स, ब्लूटूथ नसलेल्या डिव्हाइसला देखील करता येईल कनेक्ट; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्सने इन्हँस्ड साउंड आणि हायजीन फीचर्ससोबत अपग्रेडेड वायरलेस सादर केले आहे आहे. एलजीने , TONE-TFP8 आणि TONE-TFP5 हे तीन मॉडेल दक्षिण कोरियात सादर केले असून, याची किंमत १,६९,०० वोन (जवळपास १० हजार रुपये) ते २४९,००० वोन (जवळपास १६ हजार रुपये) आहे. हे इयरबड्स या महिन्याच्या अखेरीस उत्तर अमेरिका आणि यूरोपमध्ये उपलब्ध होतील. वाचा: रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियातील प्रमुख विज्ञान-तंत्रज्ञान यूनिव्हर्सिटी, POSTECH मध्ये एर्गोनोमिक डिझाइन टेक्नोलॉजी लॅबच्या मदतीने कंपनीने शेकडो लोकांच्या कानाचे विश्लेषण केले. त्यानंतर शानदार डिझाइनचे इयरबड्स आणले आहेत. नवीन कॅनाल टाइप इयरबड्चे वजन मागील मॉडेलच्या तुलनेत ०.४ ग्रॅम हलके असून, याचे वजन केवळ ५.२ ग्रॅम आहे. प्रत्येक इयरबडमध्ये तीन मायक्रोफोन देण्यात आले आहे. तसेच, प्रसिद्ध ब्रिटिश ऑडिओ सॉल्यूशन प्रोव्हाइडर मेरिडियन ऑडिओपासून ते अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सिलेशन आणि अ‍ॅडवांस्ड साउंड तंत्रज्ञानासोबत येतात. एलजीने म्हटले आहे की, मोठे आणि आधुनिक ड्राइव्हर्स फ्लेक्सिबिलिटी आणि गती देतात. तसेच, नवीन टोन फ्री मॉडेल अधिक स्पष्ट आवाजासह अधिक शक्तीशाली बास प्रदान करतात. वाचा: चार्जिंग केससह येतात इयरबड्स TONE-TFP9 आणि TONE-TFP8 मॉडेल UVnano चार्जिंग केससह येतात. हे हे इयरबड्सच्या आतील बाजूला किटाणूरहित करण्यासाठी अल्ट्रावायलेट लाइटचा उपयोग करते. नॉन-ब्लूटूथ डिव्हाइससोबत देखील करेल काम प्रीमियम TONE-TFP9 मॉडेलमध्ये प्लग अँड वायरलेसचा समावेश आहे. डिव्हाइसमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नसतानाही याचा वापर करू शकता. एकदा चार्ज केल्यावर हे मॉडेल १० तास वापरू शकता. तसेच, चार्जिंग केससोबत ५ मिनिटं चार्ज केल्यास १ तास वापर करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BFRwVR

Comments

clue frame