जिओच्या ‘या’ प्लान्समध्ये मोफत पाहू शकता नेटफ्लिक्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : भारतात नेटफ्लिक्सचे १९९ रुपयांपासून ते ७९९ रुपयांपर्यंत ४ सबस्क्रिप्शन प्लान्स आहेत. नेटफ्लिक्सच्या १९९ रुपयांच्या मोबाइल प्लान अंतर्गत दोन स्क्रीनचा अ‍ॅक्सेस मिळतो. तर तीन प्लान ४९९, ६४९ आणि ७९९ रुपयांचे आहेत. नेटफ्लिक्सच्या या तिन्ही प्लानमध्ये फोन, टॅबलेट, कॉम्प्यूटर आणि टीव्हीसह ४ डिव्हाइसचा सपोर्ट मिळतो. तिन्ही प्लानच्या व्हिडीओ क्वालिटीमध्ये थोडा फरक आहे. वाचा: मेंबरशिप घेण्यासाठी तुम्ही नेटफ्लिक्सच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. येथे तुम्ही यूपीआय, डेबिट/क्रेडिट कार्ड, पेटीएम आणि अन्य माध्यमातून पेमेंट करू शकता. मात्र, जर तुम्हाला नेटफ्लिक्सचे प्लान पैसे देऊन घ्याचे नसतील व मोफत प्लान हवा असल्यास काही टेलिकॉम कंपन्या ही सुविधा देतात. रिलायन्स जिओकडे असे अनेक आहेत ज्यात मेंबरशिप मोफत मिळते. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. च्या प्लानमध्ये मिळेल फ्री नेटफ्लिक्स
  • १,४९९ रुपयांच्या फायबर प्लानमध्ये मोफत नेटफ्लिक्ससह ३००एमबीपीएस स्पीडने अनलिमिटेड डेटा, ३० वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
  • २,४९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३० दिवस वैधतेसह ५०० एमबीपीएस स्पीडने अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मिळेल.
  • ३,९९९ रपयांच्या जिओ फायबर प्लानमध्ये नेटफ्लिक्स, १ जीबीपीएस स्पीडने अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानची वैधता देखील ३० दिवस आहे.
  • ८,४९९ रुपयांच्या या प्लानमध्ये ३० दिवस वैधतेसह १ जीबीपीएस स्पीडने अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यात एकूण ६६०० जीबी डेटा मिळतो.
वाचा: असे घ्या जिओ फायबर कनेक्शन मोफत जिओ फायबर कनेक्शन घेण्यासाठी तुम्ही .com वेबसाइट किंवा जिओ अ‍ॅपवर जाऊ शकता. जिओ फायबर ग्राहक नंबरला रिचार्ज करण्यासाठी paytm, Google Pay, PhonePe च्या माध्यमातून पेमेंट करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x3Puvh

Comments

clue frame