नवी दिल्ली : आपला नवीन Micromax In 2b ला ३० जुलैला भारतात लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवरून होणार असून, याचा टिझर समोर आला आहे. फ्लिपकार्टवर जारी टीझरमध्ये फोनचे काही फीचर्स समोर आले आहेत. याशिवाय फोनचे डिझाइन देखील समोर आले आहे. वाचा: मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळेल. याशिवाय रियरला डाव्या बाजूला वरती ड्यूल कॅमेरा मिळेल. फ्लिपकार्टवर फोनचे एक वेगळे पेज देखील लाइव्ह झाले आहे. हा स्मार्टफोन ३० जुलैला दुपारी १२ वाजता लाँच होईल. फोनला आणि मायक्रोमॅक्सच्या साइटवरून ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन रंगात खरेदी करू शकता. In 2b मध्ये रियर पॅनेलवर फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. उजव्या बाजूला पॉवर बटन दिले आहे. फोन ग्रेडिएंट फिनिशिंगसोबत येईल. फोनच्या प्रोसेसरबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, ग्राफिक्ससाठी Mali G52 GPU मिळेल. वाचा: या स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. याबाबत दावा केला आहे की, १६० तास म्यूझिक प्लेबॅक, २० तास वेब ब्राउजिंग आणि १५ तास व्हिडीओ स्ट्रिमिंग मिळेल. नवीन फोन गेल्यावर्षी लाँच केलेल्या Micromax In 1b चे अपग्रेडेट व्हर्जन असेल. यामध्ये मीडियाटेक हीलिया जी३५ प्रोसेसर आणि ४ जीबीपर्यंत रॅम मिळते. नवीन फोनची किंतम १० हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i94rbh
Comments
Post a Comment