सॅमसंगचा 'हा' स्मार्टफोन ८ हजार रुपये स्वस्त किंमतीत मिळतोय, आज अखेरचा दिवस

नवी दिल्लीः Amazon Prime Day: अॅमेझॉनच्या प्राइम डे सेल मध्ये स्मार्टफोन्स, टीव्ही आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. या सेल मध्ये सॅमसंगच्या गॅलेक्सी एम ३१ एस फोनवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. अॅमेझॉनचा हा सेल २७ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. हा सेल फक्त प्राइम मेंबर्स साठी आहे. जाणून घ्या या फोनविषयी. वाचाः वर ऑफर्स Samsung Galaxy M31s ची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. अॅमेझॉन प्राइम डे सेल मध्ये हा फोन फक्त १६ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येवू शकतो. म्हणजेच या फोनवर ८ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय, फोनला आणखी स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. जर तुम्ही हा फोन खरेदी करताना HDFC डेबिट कार्ड वरून फोनचे पेमेंट केले तर ५०० रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकतो. वाचाः Samsung Galaxy M31s चे फीचर्स Samsung Galaxy M31s अँड्रॉयड १० वर आधारित वन यूआय वर काम करतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शन दिले आहे. फोनमध्ये Octa-Core Exynos 9611 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ८ जीबी पर्यंत रॅम दिले आहे. वाचाः Samsung Galaxy M31s चा दमदार कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे. ज्यात Sony IMX682 सेंसर दिले आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा एक सेन्सर दिला आहे. याशिवाय, अतिरिक्त ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. ५ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पंच होल डिस्प्ले डिझाईन दिली आहे. अॅमेझॉनवर १६ हजार ९९९ रुपये किंमतीत मिळणाऱ्या फोनची ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजची किंमत असेल. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2USnBcr

Comments

clue frame