7000mAh बॅटरीचा Samsung Galaxy M51 स्मार्टफोनवर बंपर ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः Samsung Smartphone under 20000: स्मार्टफोनच्या बॅटरीला वारंवार चार्ज करण्याचा कंटाळा येत असेल तर 2021 या सेलमध्ये हा स्मार्टफोन स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या फोनला डिस्काउंट आणि ऑफर्स सोबत खरेदी करू शकता. हा फोन भारतातील सर्वात पहिला 7000mAh Battery चा स्मार्टफोन आहे. वाचाः स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा इनफिनिटी ओ स्क्रीन सह कॉर्निंग गोरिला ग्लासचा वापर करण्यात आला आहे. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर सोबत ग्राफिक्स अॅड्रेनो ६१८ जीपीयू दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी आणि ८ जीबी रॅम पर्याय दिले आहेत. तसेच १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेजला वाढवता येवू शकते. वाचाः Samsung Galaxy M51 स्मार्टफोनमध्ये रियर पॅनेलवर ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, सोबत १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 7000mAh ची बॅटरी दिली आहे. २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइडवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनवर सूट नंतर १९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. ३१ टक्के सूट या फोनवर मिळत आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rzVvhX

Comments

clue frame