नवी दिल्ली : एकापेक्षा एक अधिक क्षमतेच्या चार्जिंग सपोर्टसह स्मार्टफोन्स लाँच होत आहेत. आता लवकरच १६० वॉट चार्जिंग क्षमतेचा लाँच करणार आहे. याबाबत स्वतः कंपनीने ट्विटरवरून माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन चर्चेत आहे. याआधी देखील रिपोर्टमध्ये याबाबतचा खुलासा झाला होता. मात्र, आता कंपनीने स्वतः १६० वॉट चार्जिंग क्षमतेच्या स्मार्टफोनबाबत माहिती दिली आहे. आतापर्यंत फ्लॅगशिप स्तरावर फोनमध्ये १२० वॉट चार्जिंग क्षमता दिली जात आहे. वाचाः ने आपल्या हँडलवर एक टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. यात १६० वॉट चार्जिंग क्षमतेच्या फोनचे संकेत मिळतात. या टीझरमध्ये एक फोन दिसतो, जो चार्जिंगला लावण्यात आला आहे. सोबतच फोनच्या डिस्प्लेवर १६० वॉट लिहिण्यात आले आहे. यामुळे कंपनी लवकरच १६० वॉट चार्जिंग सपोर्टसह फोन लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या स्मार्टफोनचे नाव काय असेल व कधी लाँच होणार याबाबत कंपनी अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. ६० वॉट चार्जिंग क्षमतेसह अंदाज वर्तवला जात आहे की हा कंपनीचा हाय-एंट फ्लॅगशिप स्तरावरील फोन असेल. वाचाः दरम्यान, १२० वॉट चार्जिंग क्षमतेसह ४००० एमएएचची बॅटरी १५ मिनिटात फूल चार्ज होते. अशात १६० वॉट चार्जिंग क्षमतेसह फोन पूर्ण चार्ज होण्यास केवळ १० मिनिटे लागतील. याआधी काही रिपोर्ट्समध्ये इनफिनिक्सच्या या फोनबाबत कथित रेंडर्स देखील समोर आले आहेत. या रेंडर्समध्ये फोनचे डिझाइन दिसते. यात होल-पंच कटाउट, स्लिम बेझल्स आणि गोल किनारे आहेत. फोनच्या बॅक पॅनेलवर NOW असे ब्रँडिंग दिसते. तर किनाऱ्यावर Infinix लिहिलेले आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gNeLVC
Comments
Post a Comment