Tinder मध्ये आले एकदम झकास फीचर, आता मॅचच्या आधीच करू शकता चॅटिंग

नवी दिल्ली : जर तुम्ही प्रेम शोधण्यासाठी चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण, आता मॅचिंगच्या आधीच एकमेकांना ओळखण्यासाठी टिंडरवर यूजर्सला चॅट करता येणार आहे. यासाठी कंपनीने 'हॉट टेक्स्ट' फीचरची घोषणा केली आहे. वाचाः कंपनीने निवेदनात म्हटले आहे की,नवीन यूजर्सला लो-स्टेक्स सेशनमध्ये मॅचच्या आधीच कोणासोबतही चॅटिंग करण्याची परवानगी देते. टाइमर काउंट डाउन सुरू झाल्यानंतर मॅच करायचे आहे की नाही अथवा टाइमरला नवीन व्यक्तीला भेटण्यासाठी समाप्त करायचे आहे, हे निवडण्याचा पर्याय यूजर्सला असेल. टिंडरचे सीईओ जिम लॅनझोन म्हणाले की, कोविडनंतर जगभरातील डेटर्सची एक नवीन पिढी अजून बरचं काही मागत आहे. स्वतःला प्रामाणिक दाखवणे, मजा करणे, दुसऱ्यांसोबत बोलण्यासाठी अधिक पर्याय आणि टिंडरवर कोणाशी बोलत आहे व भेटत आहे यावर नियंत्रण, अशा गोष्टींची मागणी केली जात आहे. वाचाः दरम्यान, कंपनीने एक नवीन फीचर्सची सीरिज सुरू केली आहे. ज्यात प्रोफाइलमध्ये व्हिडीओचा समावेश आहे. कंपनीनुसार, व्हिडीओ Gen Z ला त्यांच्या प्रमाणिक गोष्टी सांगण्याचा एक नवीन पर्याय आहे . हे २०२१ मध्ये डेटिंगची एक पद्धत दर्शवतो. याशिवाय नवीन एक्सप्लोर सेक्शनची देखील घोषणा करण्यात आली आहे. ज्यात सदस्यांना, आवड, गतिविधी अथवा कॉन्टेंट टाइप नेव्हिगेट करता येते. यामुळे नवीन व्यक्तींना शोधण्यास मदत मिळेल. पहिल्यांदाच टिंडरमध्ये एक नवीन सेक्शन दिले जात आहे, ज्याद्वारे नवीन लोकांना भेटण्याच्या पद्धतीचा विस्तार केला जात आहे. यात यूजर्स आपल्या आवडी-निवडीच्या आधारावर व्यक्तीला शोधू शकतात. कंपनीनुसार, जगभरात ६५ बिलियन पेक्षा अधिक मॅचसोबत टिंडर जगातील सर्वात लोकप्रिय अ‍ॅप आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35MccwQ

Comments

clue frame