नवी दिल्ली : स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केल्यानंतर आता ने भारतात नवीन लाँच केला आहे. याच्या मदतीने यूजर्स आता स्मार्ट टीव्हीवर हाय-रिझॉल्यूशन व्हिडीओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकतील. स्मार्ट टीव्ही बहुतांश जणांकडे असतो. अशात जर मित्र अथवा नातेवाईकांसोबत मोठ्या स्क्रीनवर व्हिडीओ कॉलिंगचा आनंद घ्यायचा असेल तर Mi TV Webcam चांगला पर्याय आहे. या वेबकॅममध्ये २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. वाचाः Mi TV Webcam ची किंमत शाओमीने Mi TV Webcam ला भारतात १,९९९ रुपये किंमतीत लाँच केले आहे. लूकसोबतच फीचर्सच्या बाबतीत जबरदस्त आहे. या वेबकॅमला तुम्ही स्मार्ट टीव्हीवर सहज फीट करू शकता. यामध्ये तुम्हाला २५fps वर फूल एचडी म्हणजेच १०८० पिक्सल रिझॉल्यूशनमध्ये व्हिडीओ कॉलिंगची सुविधा मिळेल. हा वेबकॅम ७१ डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू कव्हर करतो. यात फार-फील्ड मायक्रोफोन्स आहेत, ज्याच्या मदतीने लांबून देखील समोरच्या व्यक्तीला आवाज स्पष्ट ऐकू येईल. या वेबकॅमला २८ जूनपासून Mi.com सोबतच Mi Home आणि Mi Studio स्टोर्सवरून खरेदी करू शकता. वाचाः Mi TV Webcam चे फीचर्स Mi TV Webcam द्वारे तुम्ही च्या मदतीने करता येईल. २ मेगापिक्स कॅमेऱ्यासह येणाऱ्या या वेबकॅमध्ये ३डी इमेज नॉइज रिडक्शन अल्गोरिद्म आहे, जे खराब फोटोला क्लियर करते. यूएसबी टाइप सी पोर्टसह येणाऱ्या वेबकॅमच्या कॅमेऱ्याला तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता अथवा बंद करू शकता. या वेबकॅमला तुम्ही कॉम्प्यूटर मॉनिटरवर देखील सेट करू शकता. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vToRIS
Comments
Post a Comment