मोठ्या स्क्रीनवर घ्या चित्रपट-सीरिज पाहण्याचा आनंद; १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात 'हे' LED TV
नवी दिल्ली : चित्रपट-सीरिज पाहण्याचा आनंद हा स्मार्टफोन पेक्षा मोठ्या स्क्रीनवरच येत असतो. अशात जर खरेदी करायचा असल्याचे त्याचे बजेट मात्र अधिक असते. मात्र, बाजारात काही कमी किंमतीतील शानदार टीव्ही HD डिस्प्लेसह येतात. या टीव्हींच्या मोठ्या स्क्रीनवर तुम्ही तुमचा आवडता कार्यक्रम, चित्रपट अगदी मजेत पाहू शकता. अशाच काही १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या उत्तम टीव्हींविषयी जाणून घेऊया. वाचाः 60 cm (24 inch) HD Ready LED TV KODAK च्या या टीव्हीमध्ये २४ इंचाची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त टीव्हीत २० वॉटचा पॉवरफूल स्पीकर मिळतो. यामुळे चित्रपट पाहताना दुप्पट आनंद मिळतो. Flipkart वर हा टीव्ही ८,९९९ रुपयात उपलब्ध आहे. R9 60 cm (24 inch) HD Ready LED TV Thomson च्या या टीव्हीमध्ये २४ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला असून, याचे ब्राइटनेस ३०० निट्स आहे. यामुळे चित्रपट, व्हिडीओ पाहताना दुप्पट आनंद मिळते. या टीव्हीमध्ये अनेक पोर्ट्स देखील मिळतात. याद्वारे तुम्ही लॅपटॉप कनेक्ट करून टीव्हीला पीसी प्रमाणे वापरू शकतात. या टीव्हीची किंमत ९,४९९ रुपये आहे. वाचाः eAirtec 61 cms (24 inches) HD Ready LED TV eAirtec चा हा LED TV २४ इंच शानदार स्क्रीनसोबत येतो. यात २५० निट्स ब्राइटनेस मिळते. टीव्हीमध्ये बॉक्स स्पीकर मिळतो, जो तुमच्या गेमिंग आणि चित्रपट पाहण्याचा अनुभव वाढवतो. Amazon वर हा टीव्ही ७,९९९ रुपयात उपलब्ध आहे. 60 cm (24 Inches) HD Ready LED TV Kevin चा LED TV देखील २४ इंच डिस्प्लेसह येतो. यात HRDD क्वालिटी मिळते, ज्यामुळे व्हिडीओ अधिक स्पष्टपणे पाहता येतात. याशिवाय यात तुम्हाला सिनेमो झूम टेक्नोलॉजी मिळेल. Amazon वरून टीव्हीला ८,५९९ रुपयात खरेदी करू शकता. 60 cm (24 inches) HD Ready LED TV २० वॉटच्या दोन स्पीकरसह येणाऱ्या Fortex च्या या टीव्हीत २४ इंचाची एचडी स्क्रीन मिळते. स्पीकरमुळे टीव्ही तुमच्या रुमला सिनेमा हॉलच बनवून टाकेल. तसेच, टीव्हीला खूपच कमी बेझल्स आहेत. Amazon वर हा टीव्ही ७,८९९ रुपयात उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3y2TpJo
Comments
Post a Comment