नवी दिल्ली. itel कंपनी, नवीन रेंज जुलैमध्ये भारतीय बाजारात लाँच करू शकते. नवीन अहवालानुसार या टीव्हीच्या काही वैशिष्ट्यांविषयी माहितीही समोर आली आहे. 4K ५५ इंच वेरियंट मध्ये सादर करण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासोबतच इतर स्क्रीन आकाराचे व्हेरिएंट्स देखील लाँच केले जाऊ शकतात. ही मालिका लाँच झाल्यावर बाजारामधील अनेक कंपन्यांच्या टीव्ही रेंजला चांगली स्पर्धा मिळेल यात शंका नाही. वाचा : itel Smart TV 4K बर्याच उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह येईल. ज्यात, एक शक्तिशाली प्रोसेसर, उत्कृष्ट ध्वनी गुणवत्ता आहे ज्यासाठी २४ डब्लू डॉल्बी ऑडिओ दिले जाऊ शकते. नवीन Android आवृत्ती देखील यात अपेक्षित आहे. itel Smart TV 4K अपर-मिडल-इनकम ग्रुपसाठीच ऑफर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. जर वापरकर्ते त्यांचा टीव्ही अपग्रेड करण्याचा विचार करत असतील तर ते काही काळ प्रतीक्षा करू शकतात. मागील वर्षी itel ने टीव्ही विभागात प्रवेश केला. यानंतर कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये चांगले आणि मोठे व्हेरिएंट्स बाजारात आणले. आयटेलच्या आय-मालिका श्रेणीने प्रीमियम गुणवत्तेमुळे मोठे यश मिळविले. यानंतर आयटेलने जी-सिरीज अंतर्गत अँड्रॉइड टीव्हीसुद्धा सुरू केले आहेत.सध्या कंपनी, कंपनीचा पोर्टफोलिओ विस्तारित करण्याचा प्रयत्न करीत आहे. याशिवाय इतर कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. परंतु, अहवालानुसार टीव्ही जुलैमध्ये लाँच करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आयटेल स्मार्टफोन टीव्ही विभागात अधिक विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे. CMR इनसाइट्स नुसार , कंपनी आधीच ७,००० रुपयांच्या श्रेणीतील एक चांगला ब्रँड आहे. वाचा : वाचा : वाचा :
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gNEr4d
Comments
Post a Comment