नवी दिल्लीः Garmin ने मार्केट मध्ये आपली नवीन स्मार्टवॉच Forerunner 55 ला लाँच केले आहे. या फिटनेस स्मार्टवॉचची किंमत २० हजार ९९० रुपये आहे. कंपनीने या वॉचला तीन कलर ऑप्शनमध्ये मॉन्टेरा ग्रे, अॅक्वा आणि ब्लॅक या तीन रंगात लाँच केले आहे. ही स्मार्टवॉच 5 ATM वॉटर रजिस्टेंस आणि मोठी बॅटरी लाइफ सोबत येते. फिटनेस ट्रॅकिंगसाठी यात जबरदस्त फीचर्स आणि मोड दिले आहेत. वाचाः गार्मिन फोररनर ५५ चे फीचर्स या वॉच मध्ये 208x208 पिक्सल रेजॉलूशन सोबत १.०४ इंचाचा राउंड कलर डिस्प्ले दिला आहे. ब्लूटूथ कनेक्टिविटी सोबत असलेल्या या वॉचला अँड्रॉयड सोबत iOS डिवाइसेज सोबत पेयर केले जाऊ शकते. ही वॉच 5 ATM वॉटर रजिस्टेंस आहे. यात तुम्हाला जीपीएस कनेक्टिविटी मिळणार आहे. ही वॉच युजर्संना २०० तासांपर्यंत अॅक्टिविटीला रिकॉर्ड करू शकते. वाचाः स्मार्टवॉच मध्ये देण्यात आलेली बॅटरी पॉवरफुल आहे. कंपनीचा दावा आहे की, ही अॅक्टिव जीपीएस मोडवर २० तासांपर्यंत बॅक अप देते. या स्मार्टवॉच मध्ये अलार्म, टायमर, स्टॉपवॉच आणि सनराइज व सनसेट चे टाइम बनवते. या वॉचचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात फाइंड माय वॉच फीचर सोबत येते. याच्या मदतीने युजर आपल्या स्मार्टफोनला लोकेट करू शकते. वाचाः हेल्थ मॉनिटरिंग साठी स्मार्टवॉच मध्ये हार्ट रेट मॉनिटर, रेस्पिरेशन रेट, फिटनेस एज, स्ट्रेस मॉनिटरिंग, स्लीप मॉनिटरिंग, हाइड्रेशन आणि महिलांच्या आरोग्यासाठी खास मोड दिले आहेत. याशिवाय, या वॉच मध्ये तुम्हाला स्टेप काउंटर, ऑटो गोल्स फीचर, बर्न करण्यात आलेली कॅलरी सोबत अनेक माहिती मिळू शकणार आहे. वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gX262y
Comments
Post a Comment