नवी दिल्ली : लाइफस्टाइल कंज्यूमर टेक ब्रँड ने MISFIT ट्रीमर लाँच करत पर्सनल ग्रुमिंग कॅटेगरीमध्ये एंट्री केली आहे. कंपनीने सादर केला असून, हा आणि बोटच्या वेबसाइटवर ८९९ रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे. हा अॅक्टिव ब्लॅक आणि सिल्वर रंगात येतो. वाचाः boAt चे सह-संस्थापक अमन गुप्ता म्हणाले की, इयरवियर आणि वियरेबल कॅटेगरीमध्ये स्थान मिळवल्यानंतर आता Misfit ब्रँड अतरंगत लाइफस्टाइल पोर्टफोलियाला मजबूत करण्याची तयारी करत आहोत. Misfit सोबत आम्ही युवकांसाठी प्रोडक्ट्स डिझाइन करून पर्सनल केअर कॅटेगरीमध्ये एक नवीन दृष्टीकोन आणण्याचा प्रयत्न करत आहोत. Misfit T50 Trimmer चे वैशिष्ट्ये
- T50 त्वचेला पुरक टायटेनियम कोटेड ब्लेडसोबत येतो. याला गंज लागत नाही व त्वचेला कोणतीही जखम न होता सुरक्षित व क्लिन ट्रिमिंग करण्यास मदत करते.
- या ब्लेडला सहज वेगळे करता येते. तसेच ब्लेड धुवू शकता अथवा ब्रशने साफ करू शकता. खास गोष्ट म्हणजे ट्रिमर सिंगल चार्जमध्ये १६० मिनिटे टिकणाऱ्या लिथियम बॅटरीसह येतो. ट्रिमरला पूर्ण चार्ज होण्यास केवळ १.५ तास लागतात.
- Misfit T50 ट्रिमरमध्ये ४० लेंथ सेटिंग्स आहे, जी ०.५ मिमीच्या अंतराने कमी-जास्त करता येते. ह्याने तुम्ही तुम्हाला हवे तसे ट्रिम करू शकता.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qtEZ2G
Comments
Post a Comment