नवी दिल्लीः iQOO 3 स्मार्टफोनला आता कमी किंमतीत खरेदी करू शकता. भारतात या फोनला तीन व्हेरियंट मध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी, ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज मध्ये लाँच केले होते. लाँच वेळी या फोनची सुरुवातीची किंमत ३६ हजार ९९० रुपये होती. लाँच पासून आतापर्यंत कंपनीने या फोनच्या किंमतीत २० हजार रुपयांनी स्वस्त केला आहे. किंमत कपात करण्यात आल्यानंतर फोनची किंमता आता १७ हजार ४९५ रुपये झाली आहे. वाचाः आता या फोनच्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १८ हजार ९९५ रुपये, १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फओनची किंमत २२ हजार ४९५ रुपयात खरेदी करू शकता. कंपनीने याआधी फेब्रुवारी मध्ये या फोनच्या सर्व व्हेरियंटच्या किंमती कमी केल्या होत्या. फेब्रुवारीत मिळालेल्या कपातीनंतर या फोनची सुरूवातीची किंमत २४ हजार ९९० रुपये होती. कंपनीने या वर्षी या फोनच्या किंमतीत झपाट्याने कपात केली आहे. आता कंपनी या स्मार्टफोनचा स्टॉक लवकरात लवकर संपवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. वाचाः कंपनीच्या ऑनलाइन स्टोरवरून या फोनला खरेदी करू शकाल नवीन किंमती सोबत iQOO 3 स्मार्टफोनला कंपनीच्या ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करू शकता. लिस्टिंगनुसार या फोनच्या ४जी व्हेरियंटचे आता क्वॉंटम सिल्वर कलर व्हेरियंट स्टॉकमध्ये उपलब्ध आहे. तर फोनचे 5G व्हेरियंट कंपनीच्या साइटवर क्वॉंटम सिल्वर आणि टॉरनाडो ब्लॅक मध्ये उपलब्ध आहे. iQOO 3 चे फीचर्स फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज व्हेरियंटच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिले आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनेलवर एलईडी फ्लॅश सोबत चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत १३ मेगापिक्सलचा एक २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबत या फोन मध्ये तुम्हाला 4440mAhची बॅटरी मिळेल. ५५ वॉट सुपर फ्लॅश चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TRHEa6
Comments
Post a Comment