अ‍ॅपलने बंद केले 'या' आयफोन मॉडेलचे उत्पादन, एवढे दिवसच खरेदीची संधी

नवी दिल्ली : अ‍ॅपलने गेल्यावर्षी आयफोन १२ सीरिजमध्ये ४ आयफोन लाँच केले होते. यामध्ये आयफोन १२ मिनी, आयफोन १२, आयफोन १२ प्रो आणि आयफोन १२ प्रो मॅक्सचा समावेश होता. यामध्ये एकमेव मॉडेल होते ज्याला अधिक पसंती मिळाली नाही. मात्र, आता एका रिपोर्टनुसार, अ‍ॅपलने आयफोन १२ मिनीचे उत्पादन थांबवले आहे. उत्पादन थांबवले असले तरीही अ‍ॅपलच्या वेबसाइटवर मॉडेल उपलब्ध असून, जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत विक्री सुरू राहिल. वाचाः ट्रेंडफोर्सच्या रिपोर्टनुसार, आता तीन नॉन मिनी मॉडेल्सवर लक्ष देणार असून, त्यांची विक्री वाढवणार आहे. आयफोन १२ मिनीने चांगले प्रदर्शन न केल्याने कंपनीची निराशा झाली आहे. वाचाः आयफोन १२ मिनी हा एक स्वस्त फोन असून, गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन १२ सीरिजमधील सर्वात लहान, पातळ आणि हलका ५जी डिव्हाइस आहे. आयफोन एसई सेकेंड जनरेशन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी देखील हा पर्याय होता. मात्र, आयफोन १२ मिनीचे पूर्ण विक्रीमध्ये केवळ २० टक्के योगदान होते. दरम्यान, अ‍ॅपलने या मॉडेलचे उत्पादन थांबवल्याने स्टॉक असेपर्यंतच ग्राहकांना याची खरेदी करता येईल. भलेही या डिव्हाइसची कामगिरी चांगली नसली तरीही कंपनी आयफोन १२ मिनीचे आणखी एक व्हर्जन लाँच करू शकते, जे आयफोन १३ सीरिजमध्ये पाहायला मिळेल. यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. आयफोन १३ सीरिजबद्दल माहिती आता समोर येत असून, ही सीरिज सप्टेंबर महिन्यात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2T1pbaV

Comments

clue frame