नवी दिल्ली. Airtelने अलीकडेच १७९ आणि २७९ रुपयांचे प्रीपेड प्लान्स बंद केले आहे . आता कंपनीच्या ४५ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचा देखील या यादीमध्ये समावेश करण्यात आला असून एअरटेलचा ४५ रुपयांचा प्लान आता कंपनीने त्याच्या पोर्टफोलिओ वरून काढून टाकला आहे. याशिवाय १२८ रुपयांमध्ये नवीन स्मार्ट रिचार्ज देखील सादर करण्यात आले आहे. वाचा : Airtelने नुकतेच नॉन-एफयूपीसह नवीन प्रीपेड बाजारात आणले. आता टेलिकॉम कंपनी आपल्या स्मार्ट रिचार्ज विभागाचा विस्तार करीत आहे. एअरटेलचे स्मार्ट रिचार्ज विशेषत: अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना कोणत्याही फायद्याशिवाय केवळ वैधता हवी आहे. आता एअरटेलने या विभागात १२८ रुपयांचा नवीन प्लान बाजारात आणला आहे. एअरटेलच्या ४५ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये लोकल व एसटीडी कॉलसाठी प्रति सेकंद २.५ पैसे आकारले जात होते. याशिवाय स्थानिक मेसेजेसाठी १ रुपये आणि राष्ट्रीय मेसेजेससाठी १.५ रुपये द्यावे लागायचे. तर, डेटासाठी कंपनी ५० पैसे / एमबी आकारत होती. १२८ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लान : जिओच्या १२८ रुपयांच्या स्मार्ट रिचार्ज प्लानमध्ये कॉलिंग, डेटा आणि मेसेजिंगचे कोणतेही फायदे देण्यात येणार नाहीत. हा पॅक खास त्या ग्राहकांसाठी डिझाइन केला आहे ज्यांना या सेवेचा २८ दिवस विस्तार करायचा आहे. या प्लानमध्ये एअरटेलचे वापरकर्ते लोकल व एसटीडी कॉल २.५ पैसे / सेकंदावर कॉल करू शकतात. स्थानिक एसएमएससाठी १ रुपया द्यावा लागेल. तर, राष्ट्रीय एसएमएससाठी १.५ रुपये आकारले जातील. याशिवाय एअरटेल ग्राहकही प्रति एमबी ५० पैसे दराने डेटा वापरू शकतील . ४९ रुपयांचा प्लान आहे परवडणारा कंपनीकडे ४९ रुपयांचे स्मार्ट रिचार्ज पॅक देखील आहे. जे, ३८.५२ रुपयांचा टॉकटाइम ऑफर करते. या पॅकमध्ये १०० एमबी डेटा देखील उपलब्ध आहे. या पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये लोकल आणि एसटीडी व्हॉईस कॉलसाठी प्रति सेकंद २.५ पैसे आकारले जातात. वाचा : वाचा : वाचा :
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3y5nbxv
Comments
Post a Comment