Redmi Note 10 Pro Max ला स्वस्तात खरेदीची संधी, २७ मे पर्यंत सेल

नवी दिल्लीः Redmi Note 10 Pro Max शाओमीचा मिड-रेंज स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनला तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. अॅमेझॉनवर सध्या Smartphone Upgrade Days सेल सुरू आहे. या सेलला आजपासून सुरूवात झाली आहे. हा सेल २७ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या फोनवर अॅमेझॉन इंडियावरून बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर, पार्टनर ऑफर अंतर्गत जबरदस्त डील दिली जात आहे. रेडमीच्या या फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले, 5020mAh ची बॅटरी, आणि १०८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. वाचाः Redmi Note 10 Pro Max ची किंमत रेडमीच्या या स्मार्टफोनला ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले असून याची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. तर या फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. या फोनवर देण्यात येणाऱ्या ऑफर्स मध्ये नो कॉस्ट ईएमआय वर ६ महिन्यासाठी खरेदी करण्याची संधी आहे. वाचाः ६ महिन्याच्या ईएमआयसाठी ग्राहकांना ६ जीबी रॅम व्हेरियंट साठी दर महिन्याला ३ हजार ३३३ रुपये, तर ८ जीबी रॅम व्हेरियंटसाठी ३ हजार ६६७ रुपये द्यावे लागतील. या फोनच्या सिटीबँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी फोन खरेदीवर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. Jio Xiaomi Redmi Note 10 Series offer 2021 अंतर्गत ग्राहकांना कॅशबॅक मिळवण्याची संधी आहे. जिओ नेटवर्कवर पहिल्यांदा ३४९ रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर ३ हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. वाचा : Redmi Note 9 Pro चे फीचर्स रेडमीच्या या फोनमद्ये ६.६७ इंचाचा फुलएचडी+ (1080x2400) एमोलेड डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज दिला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 732G चिपसेट दिला आहे. हँडसेट मद्ये ६ जीबी व ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी स्टोरेजचा पर्याय दिला आहे. स्टोरेजला ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. रेडमीच्या या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरीचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिले आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 5020mAh ची बॅटरी दिली आहे. वाचा : वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yEHJxC

Comments

clue frame