नवी दिल्लीः एक नवीन फोटो शेयरिंग अॅप सध्या जबरदस्त चर्चेत आहे. या अॅपचे नाव आहे. मार्केटमध्ये आधीच , Facebook, आणि Snapchat सारखे सोशल मीडिया अॅप्स उपलब्ध आहेत. हा अॅप एका खास फीचरने पॉप्यूलर होत आहे. हे एक anti-selfie app आहे. यावर तुम्ही स्वतः चा फोटो (सेल्फी) टाकू शकत नाही. वाचाः काय आहे Poparazzi अॅप या अॅपवर तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबातील लोकांचा कोणाचाही फोटो पोस्ट करू शकता. या अॅपचे नाव सुद्धा paparazzi सिलेब्रिटिजला फॉलो करून फोटो फोटो घेणाऱ्या फोटोग्राफरने प्रेरित दिसते. या अॅपवर फिल्टर्स, फॉलोअर्स काउंट, कॅप्शन आणि फ्रंट कॅमेरा वरून घेतलेला फोटो पोस्ट करण्याची सुविधा मिळते. वाचाः इंस्टाग्रामच्या 'posts' आणि 'tagged section' च्या पावलावर पाऊल ठेऊन Poparazzi अॅपमध्ये फोटोजसाठी दोन सेक्शन मध्ये विभागले आहे. एका सेक्शनमध्ये युजर्संकडून पोस्ट करण्यात आलेला फोटो असतो. तर दुसऱ्या सेक्शनमध्ये युजरचा जो फोटो असतो जो कुणीच पोस्ट केलेला नसतो. म्हणजेच तुम्ही तुमच्या प्रोफाइलवर दुसऱ्याच्या फोटोला टाकू शकता. तसेच दुसऱ्या लोकांच्या फोटोला पोस्ट करू शकता. त्या व्यक्तीला तुम्ही टॅग सुद्धा करू शकता. वाचाः फोटो सांगणार तुम्ही किती पॉप्यूलर आहात इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलोअर्स द्वारे माहिती होतात की, तुम्ही किती पॉप्यूलर आहात. या अॅपवर तुमची पॉप्यूलरिटीचा अंदाज यावरून लावला जातो की तुम्ही दुसऱ्यांची किती फोटो पोस्ट करता. कंपनीने सांगितले की, आम्ही Poparazzi अॅपला यासाठी बनवले आहे. लोकांना परफेक्ट बनवण्यासाठीचा दबाव कमी व्हावा. सध्या हे अॅप केवळ अॅप्पल युजर्ससाठी उपलब्ध आहे. लवकरच या अॅपला अँड्रॉयड युजर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p3W3LM
Comments
Post a Comment