Netflix वर वेब सीरीज-चित्रपट पाहण्याशिवाय आता व्हिडिओ गेम खेळा

नवी दिल्ली : व्हिडीओ स्ट्रेमिंग प्लॅटफॉर्म यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. रिपोर्टनुसार, आता नेटफ्लिक्स गेमिंग सेगमेंटमध्ये उतरणार आहे. याचा अर्थ लवकरच नेटफ्लिक्सवर व्हिडीओ गेम खेळता येणार आहे. लॉकडाऊनमुळे लोक घरात आहेत, अशात गेमिंग मार्केट टॉपवर आहे, स्ट्रिमिंगची दिग्गज कंपनी आपल्या सीरिज आणि फ्लिम्सच्या कॅटलॉगमध्ये अनेक प्रकारच्या गेम्सचा समावेश करण्याची योजना बनवत आहे. यासाठी नेटफ्लिक्स व्हिडीओ गेमशी संबंधित सिनियर एग्झिक्यूटिव्ह स्पेशलिस्टची नेमणूक करणार आहे. वाचा : पैसे कमवण्याचा आणखी एक मार्ग नेटफ्लिक्सची नवीन व्हिडीओ गेम सर्विस अ‍ॅपलच्या आर्केड सारखी असेल, जे स्बस्क्रिप्शन बेस ऑफर करते. म्हणजे एकदा स्बस्क्रिप्शन घेतल्यानंतर कोणतीही गेम खेळता येईल. कन्सल्टिंग फर्म एक्सचेंरनुसार ग्लोबल गेमिंग मार्कट आता ३०० बिलियन डॉलर पेक्षा अधिक आहे. नेटफ्लिक्सच्या या निर्णयामुळे कंपनीला उत्पन्न मिळवण्याचा आणखी एक मार्ग मिळेल. काही दिवसांपूर्वीच लाँच केले दमदार फीचर नेटफ्लिक्सने काही दिवसांपूर्वीच Play Something फीचर लाँच केले होते. यासाठी आपल्या अल्गोरिद्मचा वापर करून यूजर्सला प्ले समथिंगच्या पर्यायवर क्लिक करून नवीन सीरिज, चित्रपटापर्यंत पोहचवले जाईल. यामुळे तुम्ही जो कॉन्टेंट तुम्ही पाहिला नाही किंवा अर्ध्यातून सोडला, या आधारावर तुम्हाला आपोआप चांगला कॉन्टेंट सुचवेल. वाचाः नेटफ्लिक्सच्या स्मार्ट डाउनलोड्स फीचरबद्दल सांगायचे तर यात एक एपिसोड डिलीट करून दुसरा एपिसोड डाउनलोड होतो. नवीन फीचर डाउनलोड्स फोर यू यात बदल करते. कारण हे नवीन कॉन्टेंट डाउनलोड करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यात तुम्ही वाय-फायला कनेक्ट झाल्यानंतर आपोआप तुमच्या आवडीनुसार कॉन्टेंट डाउनलोड होईल. तुमच्यासाठी नेटफ्लिक्स सीरिजचा पहिला एपिसोड आपोआप डाउनलोड करेल. गेमिंग व्यतिरिक्त नेटफ्लिक्स आपल्या व्हिडीओ स्ट्रिमिंगमध्ये आणखी एक नवीन प्लान जोडण्याची शक्यता आहे. ज्याला ‘N-Plus' नाव दिल जाईल. यात यूजर्सला पॉडकास्ट्स, कस्टम टीव्ही शो प्लेल्सिट आणि बिहाइंड दे सीन कॉन्टेंट पाहायला मिळेल. या प्लानसाठी कंपनी काही यूजर्सकडून फीडबॅक देखील घेत आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bOPp70

Comments

clue frame