नवी दिल्ली : एअरटेल, आणि या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफरची घोषणा करत आहे. अगदी स्वस्तातील प्लानमध्ये अनेक फायदे मिळतात. यात अनलिमिटेड कॉलिंगसोबतच अनलिमिटेड डेटा देखील मिळतो. व्होडाफोन-आयडियाचा असाच एक दमदार प्लान आहे, ज्यात ग्राहकांना दररोज ११ रुपयांपेक्षा कमी खर्चात ४ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. वाचाः या प्लानची किंमत २९९ रुपये असून, यात ग्राहकांना दररोज ४ जीबी डेटा आणि १०० एमएमएसची सुविधा मिळतो. यासोबतच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच तुम्हाला या प्लानमध्ये दररोज ११ रुपयांपेक्षा कमी खर्च येईल. यासोबतच या प्लानमध्ये ची सुविधा देखील मिळेल, यात रात्री १२ ते सकाळी ६ वाजपर्यंत मोफत इंटरनेटचा वापर करता येईल. तसेच विकेंड डेटा रोलओव्हर आणि चे देखील मोफत स्बस्क्रिप्शन मिळेल. वाचाः 399 रुपयांचा प्लान व्होडाफोन-आयडियाच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळेल. या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यात बिंज ऑल नाइट, विकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi movies and TV चे मोफत स्बस्क्रिप्शन मिळेल. पुढील रिचार्जवर ४० रुपये डिस्काउंट कूपन देखील मिळेल. कंपनीचा Binge All Night ऑफरसह येणारा २४९ रुपयांचा प्लान देखील आहे. यात ग्राहकांना २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. सोबतच विकेंड रोलओव्हर देखील मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34LEoiV
Comments
Post a Comment