पॉवरफुल परफॉर्मन्सचे Infinix चे दोन स्मार्टफोन येताहेत, जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार लाँच

नवी दिल्लीः Infinix आपली नोट सीरीजचा पोर्टफोलियो वाढवणार आहे. कंपनी आपल्या नोट सीरीज अंतर्गत आणखी दोन नवीन स्मार्टफोन आणणार आहे. कंपनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि Note 10 Pro स्मार्टफोनला लाँच करणार आहे. इनफिनिक्सच्या म्हणण्यानुसार, नोट सीरीजच्या या नवीन स्मार्टफोन्स मध्ये पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी अडवॉन्स चिपसेट दिले आहे. कंपनीने सांगितले की, हे दोन्ही स्मार्टफोन सुपिरियर डिजाइन, पॉवरफुल परफॉर्मन्स, फास्टर स्पीड, स्मूद डिस्प्ले आणि फास्ट बॅटरी चार्जिंग सपोर्ट ऑफर केले जातील. वाचाः ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज सोबत येणार पहिला फोन कंपनीच्या माहितीनुसार, स्मार्टफोनला दोन वेगवेगळ्या बॅटरी कव्हर डिझाइन ऑफर केले जाणार आहे. Infinix Note 10 Pro स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसर दिला जाणार आहे. हा फोन ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज सोबत येणारा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असणार आहे. या फोनमध्ये ७ डिग्री पर्पल, ९५ डिग्री ब्लॅक आणि नॉर्डिग सीक्रेट कलर ऑप्शन्स मध्ये येणार आहे. वाचाः जूनच्या पहिल्या आठड्यात लाँच होणार दोन्ही स्मार्टफोन Infinix Note 10 स्मार्टफोन ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 प्रोसेसर सोबत येणार आहे. Infinix Note 10 स्मार्टफोनला ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज ऑप्शन्स दिले जाणार आहे. फोनला 7 डिग्री पर्पल, 95 डिग्री ब्लॅक आणि एमरल्ड ग्रीन या 3 कलर ऑप्शनमध्ये आणले जाणार आहे. कंपनीने या फोनची अधिकृतपणे लाँचिंगची घोषणा केली नाही. दोन्ही स्मार्टफोन जूनच्या पहिल्या आठवड्यात लाँच होणार आहेत. कंपनीने नुकताच भारतीय मार्केटमध्ये Hot 10S स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनची किंमत ९९९९ रुपये होती. वाचा : वाचा : वाचा :


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34ipEYj

Comments

clue frame