आधार कार्ड हरवले आहे का?, घरी बसून 'असे' बनवा, होम डिलिव्हरी होणार

नवी दिल्ली : हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे, ज्याची गरज अनेक महत्त्वाच्या ठिकाणी भासते. अनेकदा आधार कार्ड हरवते व यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत तुम्ही आधार कार्डची नवीन कॉपी काढू शकता. ()च्या वेबसाइटद्वारे तुम्ही आधार कार्डला रिप्रिंट करू शकता. वाचा : एका ओटीपीने होईल काम यूआयडीएआयनुसार OTP ऑथेंटिकेशनद्वारे हरवलेले आधार कार्ड मिळू शकते. यासाटी आधार वेबसाइट अथवा चा वापर करावा लागेल. आधार रिप्रंट करण्यासाठी ५० रुपये शुल्क लागेल. याद्वारे नवीन आधार कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर येईल. यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया. वाचा : घरबसल्या असे बनवा नवीन आधार कार्ड
  1. सर्वात आधी अधिकृत UIDAI च्या वेबसाइटवर जा.
  2. येथे Order Aadhaar Reprint या पर्यायावर क्लिक करा.
  3. आता तुमचा आधार नंबर (UID) अथवा एनरॉलमेंट आयडी (EID) नोंदवा.
  4. आता खाली दिलेला CAPTCHA लक्षपूर्वक भरा. यानंतर Send OTP पर्यायावर क्लिक करा.
  5. यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.
  6. मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी टाका आणि T&C चेकबॉक्स मार्क करून सबमिट करा.
  7. Make Payment वर क्लिक करून ऑनलाइन पेमेंटची पद्धत निवडून पैसे भरा.
  8. तुम्हाला पेमेंट गेटवेवर रिडायरेक्ट केले जाईल, जेथे तुम्हील ५० रुपये शुल्क भरू शकता.
  9. पेमेंट केल्यानंतर तुमचे आधार कार्ड प्रिंट होईल आणि १५ दिवसानंतरस्पीड पोस्टच्या माध्यमातून तुमच्या पत्त्यावर येईल.
वाचाः वाचा : वाचा :


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uebZw8

Comments

clue frame