Amazon ची फक्त तरुणांसाठी ऑफर; प्राइम मेंबरशीपवर मिळतेय ५० टक्के सूट

नवी दिल्लीः Amazon India ने नवीन प्राइम मेंबर्ससाठी Youth Offer लाँच केली आहे. या नवीन ऑफर अंतर्गत १८ ते २४ वर्ष दरम्यान असलेल्या सब्सक्राइबर्सला कंपनी ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देणार आहे. ही ऑफर केवळ त्याच सब्सक्राइबर्सला लागू होणार आहे. ज्यांनी तीन महिने किंवा वार्षिक मेंबरशीप खरेदी केली आहे. अॅमेझॉन प्राइम मेंबरशीप सोबत युजर्संना फ्री डिलिवरी, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, अॅमेझॉन म्यूझिक सारखी सर्विस मिळते. वाचाः ई-कॉमर्स दिग्गज अॅमेझॉन भारतात एक वर्षासाठी ४९९ रुपये किंमत मेंबरशीप ऑफर करते. तर ३ महिन्यांची प्राइम मेंबरशीपची किंमत १६४ रुपये द्यावी लागते. ही यूथ ऑफर फक्त १८ ते २४ वर्षाच्या युजर्संसाठी आहे. याशिवाय, अॅमेझॉनच्या या ऑफरचा फायदा फक्त अँड्रॉयड तसेच ओएस मोबाइल ब्राउजर व्हर्जनद्वारे घेऊ शकता. याचाच अर्थ आयओएस अॅप द्वारे रिचार्ज केल्यानंतर युजर्संना हा फायदा मिळणार नाही. वाचाः अॅमेझॉन युजर्संना वार्षिक मेंबरशीपसाठी ९९९ रुपये आणि ३ महिन्यासाठी ९९९ रुपये द्यावे लागतील. वयाचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी कॅशबॅक रिडीमवर केले जाणार आहे. ग्राहकांना आपल्या वयाचा पुरावा म्हणून (Aadhaar Card/ PAN Card / Voter ID Card/ Driver's Licence) यापैकी एक आयडी प्रूफ आणि सेल्फी अपलोड करावी लागणार आहे. व्हेरिफाइ मेंबरशीपवर ५०० रुपये आणि तीन महिन्याच्या मेंबरशीपवर १६५ रुपये ४८ तासांच्या आत ग्राहकांच्या अॅमेझॉन पे बॅलन्स अकाउंटवर क्रेडिट केले जाणार आहे. वाचाः यूथ ऑफर सोबत अॅमेझॉन देशात काही निवडक प्राइम मेंबर्सला ५० टक्के सूट देत आहे. कंपनीने नुकतीच १२९ रुपयांची मंथली प्राइम मेंबरशीप बंद केली आहे. हे सर्व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नवीन गाइडलाइन आल्यानंतर झाले होते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3c7FEAN

Comments

clue frame