50W फास्ट चार्जिंग आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसोबत Realme X7 Max 5G स्मार्टफोन भारतात लाँच

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने आपला जबरदस्त स्मार्टफोन ला भारतात लाँच केले आहे. हा स्मार्टफोन ३ कलर आमि २ स्टोरेज ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. Realme X7 Max 5G मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी १२०० प्रोसेसर दिला आहे. याशिवाय, नवीन स्मार्टफोनमध्ये ५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः Realme X7 Max 5G फोनची फीचर्स Realme X7 Max 5G स्मार्टफोन अँड्रॉयड ११ वर आधारीत Realme UI 2.0 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंचाचा एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 2400 x 1080 पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि आस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. या फोनमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स साठी MediaTek Dimensity 1200 चिपसेट, 12GB रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज दिले आहे. याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवले जाऊ शकते. वाचाः फोनचा कॅमेरा सेक्शन Realme X7 Max 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात पहिला ६४ मेगापिक्सलचा Sony IMX682 प्रायमरी सेंसर, दुसरा 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि तिसरा २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. या फोनमध्ये फ्रंट कॅमेरा म्हणून १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः बॅटरी आणि कनेक्टिविटी कंपनीने Realme X7 Max 5G स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली आहे. जी ५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, बॅटरी १६ मिनिटात ५० टक्के चार्ज होते. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी ५जी, वाय फाय, ब्लूटूथ ५.१, जीपीएस, ग्लोनेस, एनएफसी आणि यूएसबी टाईप सी पोर्ट दिले आहेत. वाचाः Realme X7 Max 5G फोनची किंमत Realme X7 Max 5G स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. याच्या आधीच्या मॉडलची किंमत २६ हजार ९९९ रुपये आणि दुसऱ्या मॉडलची किंमत २८९ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन Mercury Silver, Asteroid Black आणि Milky Way कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. या फोनची विक्री ४ जून पासून कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्ट वर सुरू केली जाणार आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fBoD41

Comments

clue frame