Sony ने लाँच केला ३२ इंचाचा नवीन स्मार्ट अँड्रॉयड LED TV, फीचर्स जबरदस्त

नवी दिल्लीः सोनी आपली स्मार्ट अँड्रॉयड टीव्हीची रेंज वाढवताना भारतात ला लाँच केले आहे. या टीव्हीची किंमत ३१ हजार ९०० रुपये आहे. या सेगमेंट मध्ये सर्वात जास्त फीचर ऑफर करणाऱ्या टीव्हीसोबत सांगितले जात आहे. टीव्हीचा सेल आजपासून १५ एप्रिल पासून कंपनीच्या डिस्ट्रीब्यूशन चॅनेल्स सोबत प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोर्सवर सुरू झाली आहे. या टीव्हीला युजर एक्सक्लूसिव्ह सोनी सेंटरवरून खरेदी करू शकता. वाचाः या टीव्हीचे फीचर्स ही टीव्ही बाकी सोनी स्मार्ट टीव्ही प्रमाणे अँड्रॉयड टीव्ही ओएस वर काम करतो. टीव्हीत 1366x768 पिक्सल रिझॉल्यूशनचा डिस्प्ले दिला आहे. यात कंपेटिबल डिव्हाइसेजवरून कास्टिंगसाठी यात बिल्ट इन गुगल क्रोमकास्ट मिळणार आहे. टीव्हीत गुगल असिस्टेंट सुद्धा दिला आहे. टीव्हीच्या व्हाइस रिमोट आणि कोणत्याही लिंक्ड स्पीकरला सपोर्ट करते. वाचाः ३२ इंचाचा टीव्हीत जबरदस्त व्ह्यूइंग एक्सपीरियन्ससाठी एचडीआर सपोर्ट सुद्धा मिळतो. प्रोसेसिंग आणि कंपॅटिबिलिटी लेवल वर यात HDR10 आणि HLG फॉरमॅट सपोर्ट मिळतो. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या रियलमी टीव्ही प्रमाणे या फॉर्मेट मध्ये डिस्प्ले आउटपूट मिळत नाही. टीव्हीत 60Hz पर्यंत फुल एचडी सिग्नलचा सपोर्ट मिळतो. हा टीव्ही १६ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत येतो. सोनी X-Reality Pro पिक्चर प्रोसेसिंग टेक्नॉलोजी दिली आहे. दमदार साउंड साठी २० वॉटचे स्टिरियो स्पीकर दिले आहे. कनेक्टिविटीसाठी टीव्हीत तीन HDMI पोर्ट, दो यूएसबी पोर्ट, 3.5mm ऑडियो आउटपुट आणि वायरलेस कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ 4.2 दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3adnxsp

Comments

clue frame