फक्त १९ रुपयांत फ्री कॉलिंग आणि डेटा, सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लान

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या तिन्ही कंपन्या टेलिकॉम कंपन्याकडे अनेक स्वस्त किंमतीचे प्लान आहेत. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा सोबत अनेक जबरदस्त फायदे देत आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानसंबंधी खास माहिती देत आहोत. या प्लान्सची सुरुवात १९ रुपयांपासून होते. हे ट्रूली अनलिमिटेड प्लान आहेत. जाणून घ्या या प्लानसंबंधी सर्वकाही माहिती. वाचाः एअरटेलचा १९ रुपयांचा रिचार्ज प्लान एअरटेलच्या ट्रूली अनलिमिटेड प्लानची सुरुवातीची किंमत १९ रुपयांपासून सुरू होते. एअरटेलच्या या प्लानमध्ये कोणत्याही नंबरवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. एअरटेलच्या या प्लानची वैधता २ दिवसांची आहे. म्हणजेच हा प्लान दोन दिवस चालतो. इंटरनेट चालवण्यासाठी या प्लानमध्ये युजर्संना २०० एमबी डेटा दिला जातो. एअरटेलच्या या प्लानमध्ये एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जात नाही. वाचाः वोडाफोन-आयडियाचे १९ रुपयांचे रिचार्ज वोडाफोन - आयडिया सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान १९ चा आहे. या रिचार्ज प्लानची वैधता २ दिवसांची आहे. वोडाफोन आयडियाच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. २ दिवस युजर्स कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग करू शकते. या प्लानमध्ये युजर्संना २०० एमबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये एसएमएस दिले जात नाही. वाचाः जिओचा १२९ रुपयांचा रिचार्ज प्लान रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज १२९ रुपयांचा आहे. या रिचार्ज प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. म्हणजेच फ्री कॉलिंग कॉल करू शकते. प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा दिला जातो. जिओच्या या प्लानमध्ये ३०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3agtWD1

Comments

clue frame