फेसबुक काही काळाकरिता डाऊन, युझर्सने केले वारंवार लॉगिन

आज अनेकांचा दिवस पूर्ण झाला नसावा. कारण होते ते फेसबुक डाऊन असल्याचे. वारंवार लॉगिन करण्याचा प्रयत्न आज फेलच गेला . लॉगिनचा प्रयत्न केल्यानंतर फेसबुक आवश्यक देखभालीकरिता डाऊन आहे. काही मिनिटांमध्ये सेवा पूर्ववत होईल. असा मेसेज युझर्सना दिसला. वाचा : सकाळ पासून अनेकांना यामुळे लॉगिन करता आले नाही. काही मिनिटात सेवा पूर्ववत होईल असा मेसेज जरी युझर्सना त्याच्या स्क्रीनवर दिसला असला तर सेवा खूप वेळ पूर्ववत झाली नसल्यामुळे फेसबुक युझर्सची निराशा झाली. अनेकांनी त्यांच्या मोबाईलचा स्क्रीनशॉट एकमेकांसोबत शेअर करून नेमकी अडचण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील. सुरुवातीला इंटरनेट कनेक्शन मध्ये अडसर असल्याचे अनेकांना वाटले . परंतु, लवकरच, फेसबुक डाऊन असून जवळ - जवळ सगळ्याच युसर्सना या अडचणीला सामोरं जावं लागत आहे असं स्प्ष्ट झालं. नंतर काही काळाने सेवा सुरळीत झाल्यांनतर युझर्सने सुटकेचा निःश्वास घेतला. वाचा : वाचा :


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QAVg8z

Comments

clue frame