नवी दिल्लीः in India: हँडसेट निर्माता कंपनी आसुसने काही दिवसांपूर्वी भारता आपला लेटेस्ट स्मार्टफोन ROG Phone 5 ला लाँच केले होते. या लेटेस्ट Asus Mobile च्या लाँचिंग नंतर आता कंपनीने आपल्या गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या आसुस रोग फोन ३ च्या किंमतीत कपात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आसुस रोग फोन ३ च्या किंमतीत ही दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. पहिल्या वेळी या फोनच्या किंमतीत ३ हजार रुपयांची कपात करण्यात आली होती. वाचाः आसुस रोग फोन ३ चे फीचर्स Asus ROG Phone 3 फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस (1080x2340 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज आणि टच सँपलिंग रेट २७० हर्ट्ज दिला आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ६ चा वापर करण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर ६४ मेगापिक्सलचा आहे. १३ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि तिसरा ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये २४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः या फोनची बॅटरी क्षमता 6000 mAh Battery दिली आहे. जी ३० वॉट हायबरचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये सिक्योरिटी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. या Gaming Smartphone मध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी Snapdragon 865 SoC सोबत ग्राफिक्स साठी अड्रेनो ६५० जीपीयूचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने या दोन्ही व्हेरियंटच्या किंमतीत कपात केली आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटच्या किंमतीत ४ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता या मॉडलला ४५ हजार ९९९ रुपयांऐवजी ४१ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः या फोनच्या १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबी व्हेरियंटच्या फोनच्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता या मॉडलला ४५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. नवीन किमत सोबत ROG Phone 3 ई-कॉमर्स साइट Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RQ9CCh
Comments
Post a Comment