गुगल मॅप्स आता नाही दाखवणार सर्वात वेगवान रस्ता, कंपनीच्या निर्णयामागे हे आहे कारण

नवी दिल्लीः गुगल मॅप्स प्रवास करणाऱ्यांसाठी एक आवश्यक बाब बनली आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बिगर गुगल मॅप्सची आपण कल्पना पण करू शकत नाही. जे नेहमी प्रवास करतात त्यांच्यासाठी गुगल मॅप्स खूपच आवश्यक आहे. त्यामुळे कंपनी नेहमी मॅप्समध्ये नवीन फीचर्स जोडत असते. परंतु आता कंपनीने एक असा निर्णय घेतला आहे. हे ऐकून तुम्हाला जोरदार झटका बसू शकतो. वाचाः Autoevolution च्या रिपोर्टनुसार, गुगल आत आपल्या अल्गोरिदम मध्ये बदल करणार आहे. म्हणजेच तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मॅप लावत असाल तर त्या मॅपमध्ये तु्म्हाला सर्वात वेगवान रस्ता दाखवला जात असायचा. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी तात्काळ पोहोचत होते. परंतु, आता कंपनी या फीचरला हटवत आहे. म्हणजेच गुगल मॅप्स फास्टेस्ट रुट दाखवणार नाही. वाचाः वेगवान रुट ऐवजी आता पेट्रोल आणि गॅस बचतीवर जास्त फोकस रिपोर्टच्या माहितीनुसार, या वर्षीच्या अखेरपर्यंत कंपनी एक असे अपडेट देणार आहे. ज्यात तुम्हाला फास्टेट रुट दिसणार नाही. याशिवाय, नेविगेशन अॅप तुम्हाला जो रस्ता दाखवेल त्यात तुम्ही पेट्रोलची बचत करू शकाल. नवीन अल्गोरिदम आता फ्यूल कंजम्पशन वर फोकस करणार आहे. तुमचा किती गॅस किंवा पेट्रोल या प्रवासात खर्च झाले आहे. वाचाः नवीन फीचरच्या मदतीने कार्बन कमी करण्यास मदत मिळणार आहे. रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, वेगवान रस्ता दाखवणे पूर्णपणे संपणार नाही. म्हणजेच तुम्हाला जर पेट्रोल आणि गॅस बचतीच्या रुटचा वापर करायचा नसेल तर तुम्ही थेट फास्टेस्ट रुटवर परत येऊ शकता. याशिवाय, गुगल मॅप्स पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये सुधारणा करण्यास सांगितले आहे. म्हणजेच गुगल मॅप्स युजर्स स्टेप बाय स्टेप पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची माहिती मिळू शकेल. म्हणजेच तुम्हाला किती वेळात बस मिळेल. याची माहिती मिळू शकेल. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nbsZRI

Comments

clue frame