फक्त १ रुपया जास्त द्या अन् दुप्पट वैधता मिळवा, जाणून घ्या या प्लानसंबंधी

नवी दिल्लीः देशातील खासगी टेलिकॉम कंपनी एअरटेल (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी अनेक खास प्लान ऑफर करते. एअरटेलने युजर्संना वेगवेगळ्या वैधतेचे खूप सारे प्लान मार्केटमध्ये उतरवले आहे. एअरटेलच्या दोन प्लानसंबंधी खास माहिती या ठिकाणी देत आहोत. ज्यात केवळ एका रुपयाचा फरक आहे. पण, एक रुपयात दुप्पट वैधता मिळू शकते. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः अशी मिळवा दुप्पट वैधता जर तुम्ही एअरटेलचे युजर्स असाल तर ४०० रुपये पेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज केल्यास म्हणजेच ३९८ रुपये आणि ३९९ रुपयांचे दोन पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. ३९८ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसांची आणि ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला ५६ दिवसांची वैधता मिळते. म्हणजे फक्त एक रुपयात दुप्पट वैधता मिळते. वाचाः एअरटेलचा ३९८ रुपयांचा प्लान एअरटेलचा ३९८ रुपयांचा प्लान मध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा दिला जातो. युजर्संना एकूण ८४ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये प्राइम व्हिडिओचे मोबाइल एडिशन फ्री ट्रायल दिले जाते. याशिवाय, Airtel Xstream Premium, अनलिमिटेड चेंज सोबत फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूजिक, १ वर्षाची वैधता सोबत Shaw Academy चे फ्री ऑनलाइन कोर्स आणि FASTag च्या खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक दिला जातो. वाचाः एअरटेलचा ३९९ रुपयांचा प्लान ५६ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा दिला जातो. यात युजर्संना ८४ जीबी डेटा दिला जातो. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. सोबत प्राइम व्हिडिओचे मोबाइल एडिशन फ्री ट्रायल दिले जाते. याशिवाय, Airtel Xstream Premium, अनलिमिटेड चेंज सोबत फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूजिक, १ वर्षाची वैधता सोबत Shaw Academy चे फ्री ऑनलाइन कोर्स आणि FASTag च्या खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक दिला जातो. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3axJHWu

Comments

clue frame