Airtel चे टॉप ३ प्लान, रोज ३ जीबी डेटासोबत फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी युजर्संसाठी अनेक बेस्ट प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये डेली डेटा बेनिफिट सोबत देशभर कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग दिली जात आहे. जर तुम्हाला जास्त डेटाची गरज पडत असेल तर कंपनी पोर्टफोलियोत तीन जबरदस्त प्लान करीत आहेत. या प्लानमध्ये कंपनी रोज ३ जीबी डेटा सोबत ट्रूली अनलिमिटेड कॉलिंग आणि अनेक अतिरिक्त बेनिफिट् देत आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः एअरटेलचा ३९८ रुपयांचा प्लान २८ दिवसांची वैधता सोबत या प्लानमध्ये कंपनी रोज ३ जीबी डेटा ऑफर करीत आहे. प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग सोबत रोज १०० फ्री एसएमएस देते. प्लानच्या सब्सक्रायबर्सला ३० दिवसांपर्यंत अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे मोबाइल एडिशनचे फ्री ट्रायल मिळते. याशिवाय, या प्लानमध्ये कंपनी एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे फ्री अॅक्सेस देत आहे. वाचाः एअरटेलचा ४४८ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. कंपनी या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० फ्री एसएमएस सुद्धा देते. प्लानमध्ये वर्षभरासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री सब्सक्रिप्शन देते. हा प्लान युजर्संना प्राईम व्हिडिओचे मोबाइल एडिशनचे ३० दिवसांचे फ्री ट्रायल ऑफर करते. याशिवाय, युजर्संना एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः एअरटेलचा ५५८ रुपयांचा प्लान ५६ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कंपनी देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करते. रोज १०० फ्री एसएमएस सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये एअरटेल एक्सट्रिम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन सोबत ३० दिवसांसाठी प्राइम व्हिडिओचे मोबाइल एडिशनचे फ्री ट्रायल दिले जात आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tJU94I

Comments

clue frame