Vivo ची ग्राहकांना भेट, 44MP सेल्फी कॅमेराचा Vivo V20 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात

नवी दिल्लीः विवो (Vivo) ने आपला एक जबरदस्त स्मार्टफोनची किंमतीत कपात केली आहे. विवो कंपनीचा हा स्मार्टफोन आहे. विवोने या स्मार्टफोनच्या किंमतीत २ हजार रुपयांची कपात केली आहे. गझेट नाउच्या एका रिपोर्टनुसार, मुंबईचे रिटेलर महेश टेलिकॉमच्या एका ट्विटनुसार, Vivo V20 स्मार्टफोन 8 GB रॅम सोबत 128 आणि २५६ जीबी स्टोरेज सोबत येतो. विवोचा हा फोन ऑक्टोबर मध्ये लाँच करण्यात आला होता. वाचाः किंमत कपातीनंतर फोनची किंमत पाहा महेश टेलिकॉमच्या माहितीनुसार, Vivo V20 स्मार्टफोनची सुरुवाचीतीच किंमत आता २२ हजार ९९० रुपये झाली आहे. ही किंमत ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची आहे. याआधी या फोनची किंमत २४ हजार ९९० रुपये होते. म्हणजेच फोनच्या बेस मॉडलची किंमत २ हजार रुपयांनी कमी केली आहे. तर Vivo V20 स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जबी स्टोरेजच्या फोनची किंमत २५ हजार ९९० रुपये झाली आहे. याआधी या फोनची किंमत २७ हजार ९९० रुपये होती. Vivo V20 व्हेरियंट्सची नवीन किंमती आता Flipkart आणि Amazon वर लिस्ट करण्यात आली आहे. वाचाः फोनची फीचर्स फोनध्ये ६.४४ इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080X2400 पिक्सल आहे. फोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच दिला आहे. विवोचा हा स्मार्टफोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड FuntouchOS 11 वर काम करतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 4,000 mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. विवोच्या या स्मार्टफोनमद्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. स्मार्टफोनमध्ये बॅकमध्ये मेन कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा दिला आहे. याशिवाय बॅकमध्ये ८ मेगापिक्सलचा सेकंडरी लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मोनो सेन्सर दिला आहे. विवोच्या या स्मार्टफोनमध्ये ४४ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rhpEkD

Comments

clue frame