Samsung Galaxy F02s आणि Galaxy F12 स्मार्टफोन ५ एप्रिलला होणार लाँच

नवी दिल्लीः Samsung ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आपले दोन नवीन स्मार्टफोन Galaxy F02s आणि Galaxy F12 ला लाँच करणार आहे. फ्लिपकार्टवर या दोन्ही अपकमिंग स्मार्टफोनची मायक्रोसाइट लाइव्ह झाली आहे. गॅलेक्सी एफ सीरीज कंपनीची लेटेस्ट स्मार्टफोन सीरीज आहे. या अंतर्गत कंपनीने काही आठवड्याआधी Galaxy F62 स्मार्टफोन लाँच केला होता. जाणून घ्या या दोन स्मार्टफोनविषयी. वाचाः Galaxy F02s फ्लिपकार्ट लँडिंग पेजनुसार, फोनमध्ये इनफिनिटी व्ही नॉच डिझाइन सोबत ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी सोबत येणार आहे. परंतु, फिंगरप्रिंट स्कॅनरची कमी युजर्संना जाणवणार आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये कंपनी एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देऊ शकते. रेक्टागँल शेप कॅमेरा मॉड्यूल मध्ये दिला आहे. रियरमध्ये प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. वाचाः प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४५० चिपसेट दिला आहे. फोनच्या या स्पेसिफिकेशन्सला पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, फोन गॅलेक्सी A02s किंवा गॅलेक्सी M02s रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी एफ १२ चे फीचर्स गॅलेक्सी एफ १२ मध्ये सुद्धा तुम्हाला इनफिनिटी व्ही नॉच डिझाइन सोबत ६.५ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. डिस्प्ले एचडी रिझॉल्यूशन आणि 90Hz चे रिफ्रेश रेट सोबत येणार आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर कॅमेरा सेटअप साठी स्क्वेयर मॉड्यूल दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. वाचाः गॅलेक्सी एफ १२ मध्ये तुम्हाला साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर शिवाय बॉटम मध्ये स्पीकर ग्रिल, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि ३.५ एमएम ऑडियो जॅक दिला आहे. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून याची काहीही माहिती समोर आली नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wbvIid

Comments

clue frame