Reliance Jio चे टॉप ३ प्लान, रोज ३ जीबी डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि अतिरिक्त बेनिफिट

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या युजर्संना आकर्षित करण्यासाठी अनेक जबरदस्त प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे. युजर्संना ते प्लान अधिक आकर्षित वाटतात ज्यात अनलिमिटेड कॉलिंग आणि दुसरे अतिरिक्त बेनिफिट्स सोबत डेली डेटा मिळतो. युजर्ससाठी रिलायन्स जिओ तीन प्लान ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएस आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः जिओचा ३४९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला रोज ३ जीबी डेटा ऑफर करतो. २८ दिवसांच्या वैधते सोबत कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० फ्री एसएमएसचा फायदा देत आहे. प्लानच्या सब्सक्रायबर्सला जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा सारखे जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. वाचाः जिओचा ४०१ रुपयांचा प्लान २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात कंपनी ६ जीबी एक्स्ट्रा डेटा देत आहे. हा प्लान देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस ऑफर करतो. प्लानच्या सब्सक्रायबर्सला डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः जिओचा ९९९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये रोज ३ जीबी या प्रमाणे एकूण २५२ जीबी डेटा मिळतो. बाकी प्लान्स प्रमाणे यात अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस दिले जाते. प्लानच्या सब्सक्रायबर्सला कंपनी जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा देत आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39wns2G

Comments

clue frame