नवी दिल्लीः Reliance Jio ने आपल्या ३४९ रुपयांच्या स्वस्त प्लानला नुकतेच Trending कॅटेगरीत समावेश केला आहे. जिओच्या ९९९ रुपये, ४०१ रुपये आणि ३४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा ऑफर केला जातो. जिओच्या ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग ऑफर मिळते. जाणून घ्या जिओच्या ३४९ रुपयाच्या ट्रेंडिंग प्लानसंबंधी सर्वकाही. वाचाः ३४९ रुपयांचा जिओ रिचार्ज पॅक जिओचा ३४९ रुपयांचा जिओ प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. रोज मिळणारा डेटा स्पीड कमी झाल्यानंतर 64Kbps होते. वाचाः या प्लानमध्ये व्हाइस कॉलिंग मध्ये जिओच्या ३४९ रुपयाच्या प्लानमध्ये लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा देशभर फ्री मध्ये मिळते. याशिवाय रोज १०० एसएमएस फ्री मिळते. जिओच्या या प्लानमध्ये ग्राहकांना जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा ऑफर केले जाते. ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउड सारख्या अॅप्सचा फायदा मिळतो. वाचाः जिओच्या ९९९ रुपयांच्या जिओ प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना २५२ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. तर ४०१ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा या प्रमाणे एकूण ९० जीबी डेटा ऑफर केला जातो. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bOl88o
Comments
Post a Comment