Oppo A74 4G गूगल प्ले कंसोल वर लिस्ट, फीचर्स लीक

नवी दिल्लीः स्मार्टफोनला गूगल प्ले कंसोल लिस्टिंगवर पाहिले गेले आहे. या लिस्टिंगवरुन फोनची फीचर्स उघड झाली आहेत. या फोनला ५ जी आणि ४ जी व्हेरियंट मध्ये लाँच केले जाऊ शकते. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर आणि फुल एचडी प्लस डिस्प्ले असू शकतो. लिस्टिंगवरून फोन अँड्रॉयड ११ वर काम करतो. वाचाः Oppo A74 4G चे संभावित फीचर्स MySmartPrice च्या एका रिपोर्ट नुसार, ओप्पो एक ७४ च्या काही फीचर्सची माहिती उघड झाली आहे. गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगवरुन ही माहिती उघड झाली आहे. फोनचे मॉडल नंबर OP4F11L1 सोबत लिस्ट करण्यात आले आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळणार आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये अँड्रॉयड ११ सोबत लाँच केले जाऊ शकते. वाचाः MySmartPrice द्वारा शेयर करण्यात आलेल्या एका पोस्टरमध्ये एक टिप्स्टरच्या हवाल्याने सांगितले की, ओप्पोच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी असणार आहे. फोनमध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि कलरओएस ११.१ दिला जाणार आहे. फोनमध्ये रियरवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. जो ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा दोन सेन्सर दिला जाणार आहे. फोनमध्ये पुढच्या बाजुला होल पंच कटआउट सोबत १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः ओप्पो ए74 5G ला गीकबेंच लिस्टिंग मध्ये पाहिले गेले आहे. ज्यात स्नॅपड्रॅगन ४८० प्रोसेसर असल्याचे उघड झाले आहे. हँडसेटला ६ जीबी रॅम आणि अँड्रॉयड ११ सोबत लिस्ट करण्यात आले आहे. ५ जी व्हेरियंटला याआधी NBTC, US FCC, TKDN आणि ग्लोबल सर्टिफिकेशन फोरम (GFC) वेबसाइट वर लिस्ट करण्यात आले आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dfdWlg

Comments

clue frame