नवी दिल्लीः स्मार्टफोन खरेदी करण्याची जबरदस्त संधी आहे. कंपनी या फोनच्या खरेदीवर १५०० रुपयाचे गिफ्ट कार्ड ऑफर करते. या ऑफर अंतर्गत नोकिया ५.४ ला केवळ कंपनी अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. ऑफरची वैधता ३१ मार्च पर्यंत आहे. फोन खरेदी करणाऱ्यांना डिलिवरीच्या सात दिवसांनंतर गिफ्ट कार्ड मिळणार आहे. कंपनीचा हे गिफ्ट कार्ड युजर्सच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर मिळणार आहे. वाचाः नोकिया पॉवर युजर रिपोर्टच्या माहितीनुसार, १५०० रुपयांचे गिफ्ट कार्डची वैधता ईमेलवर डिलिवरी पासून ३० दिवसापर्यंत आहे. युजर या गिफ्ट कार्डचा वापर नोकियाच्या अधिकृत वेबसाइटवरून मनपसंत प्रोडक्ट खरेदीसाठी करू शकतो. नोकिया ५.४ च्या ४ जबी रॅमच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅमच्या फोनची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. वाचाः नोकिया 5.4 चे फीचर फोन मध्ये 720x1560 पिक्सल रेजॉलूशन सोबत 6.39 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आक्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२२ प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ५ मेगापिक्सलचा आणि २ दोन मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAhची बॅटरी दिली आहे. रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनमध्ये कनेक्टिविटी साठी 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस/A-GPS, यूएसबी टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे ऑप्शन दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ff6fyc
Comments
Post a Comment