Moto G30 चा आज पहिला सेल, खरेदीवर इंस्टेंट डिस्काउंट आणि कॅशबॅक

नवी दिल्लीः मोटोरोलाचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Moto G30 चा आज पहिला सेल आहे. सेलला आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सुरूवात होणार आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सल कॅमेरा आणि 90Hz रिफ्रेश रेट सोबत अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. पहिल्या सेलमध्ये कंपनी या फोनवर अनेक आकर्षक ऑफर देत आहे. वाचाः फोनला एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय ट्रान्झॅक्शनवर युजर्संना १० टक्के इंस्टेंट डिस्काउंटचा फायदा मिळणार आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट अॅक्सेस बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅकचा फायदा मिळू शकणार आहे. फोनला एक्सचेंज ऑफर अंतर्गत खरेदी केल्यास १० हजार ३५० रुपयांपर्यंत फायदा मिळू शकणार आहे. वाचाः मोटो जी ३० चे फीचर फोनमध्ये 1600x720 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५१ इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरजेच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ६६२ चिपसेट दिला आहे. फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते. वाचाः अँड्रॉयड ११ ओएस या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, एक २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rV48TV

Comments

clue frame