मस्तच! सूर्याच्या प्रकाशाने चार्ज होणार वायरलेस स्पीकर, किंमत १,६९९ रुपये

नवी दिल्लीः UBON ने आपले वायरलेस पोर्टफोलियो चा विस्तार करताना सोमवारी नवीन SP- 115 X- Planet Solar Solar Powered True Wireless Speaker (TWS) लाँच केला आहे. यूबॉन एसपी ११५ एक्स प्लेनेस सोलर पॉवर्ड वायरलेस स्पीकर ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर मध्ये येते. या स्पीकरची किंमत १ हजार ६९९ रुपये आहे. या स्पीकरला देशात सर्व मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येऊ शकते. वाचाः कंपनीच्या म्हणण्यानुसार, सोलर एनर्जी वरून चार्ज करणारा देशात पहिला वायरलेस स्पीकर आहे. नवीन सोलर पॉवर्ड वायरलेस स्पीकर मध्ये युजसी चार्जिंग, एलईडी फ्लॅशलाइट, पोर्टेबल स्पीकर, एफएम रेडियो, टीएफ कार्ड सलोट सारखे फीचर्स दिले आहेत. यात कनेक्टिविटीसाठी यूएसबी पोर्ट, मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट मिळतो. याशिवाय, तुम्ही सोप्या पद्धतीने एफएम मोड वर स्विच करू शकता. आपली पसंतीची एफएम स्टेशनला ट्यूनइन करू शकता. वाचाः यूबॉनचे नवीन स्पीकर लेटेस्ट बिल्ट इन टीव्हीएस फीचरसोबत येते. वायरलेस V5.0 सपॉर्ट करतो. ज्याद्वारे याला १० मीटर पर्यंत ऑपरेटिंग रेंजमध्ये ब्लूटूथ द्वारे दुसऱ्या डिव्हाइस वरून कनेक्ट करू शकता. स्पीकर मध्ये 1200mAh बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, या स्पीकरला सिंगल चार्जमध्ये ९ तास पर्यंत पॉवर बॅकअप मिळणार आहे. या स्पीकरचे वजन ३०० ग्रॅम आहे. हे वायरलेस स्पीकर डस्टने खराब होत नाही. याची बॉडी स्प्लॅश आणि डस्टप्रूफ आहे. वाचाः UBON चे मॅनेजिंग डायरेक्टर मंदीप अरोड़ाने या लाँचिंग दरम्यान सांगितले की, आम्ही युबॉन मध्ये नेहमी बेस्ट डिझाईन ड्यूरेबल आणि जबरदस्त दिसणारी प्रोडक्ट आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त किंमतीत ऑफर करतो. आम्हाला विश्वास आहे की, भारतीय युजर्सला हे प्रोडक्ट खूप पसंत पडेल. ट्रॅव्हल दरम्यान ऑफिस किंवा हाउस पार्ट असो, स्पीकरला ऑल पर्पज युजर एक्सपिरियन्स देण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/394SXAF

Comments

clue frame