पेटीएम मॉलवर सेल सुरू, कॅशबॅक आणि आकर्षक ऑफर्ससह ८० टक्के सूट

नवी दिल्ली: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म पेटीएम मॉलने ग्राहकांना फायदा व्हावा यासाठी सुरू केला आहे. या सेलला २० मार्चपासून सुरूवात झाली आहे. पेटीएम मॉलने या सेलवरील विक्रीसाठी अ‍ॅक्सिस बँक, ICICI बँक आणि स्टँडर्ड बँकेबरोबर पार्टनरशीप केली आहे. होली स्पेशल सेलमध्ये १५,००० पेक्षा जास्त ब्रँडच्या उत्पादनांवर ग्राहकांना ८० टक्क्यांपर्यंत सूट, कॅशबॅक आणि आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. वाचाः स्मार्टफोनवर ऑफर अॅपल, सॅमसंग, विवो आणि ओप्पोच्या सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोनमध्ये २५ टक्के सूट आणि ५,००० रुपयांपर्यंतची कॅशबॅक मिळणा आहे. यासह ९,६०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येणार आहे. इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर ७५ टक्के सूट आणि ३,००० रुपयांपर्यंतचे कॅशबॅक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना सर्व उत्पादने नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. वाचाः पेटीएम मॉल मध्ये ग्राहकांना अन्य उत्पादने खूप स्वस्त किंमतीत खरेदी करता येऊ शकतात. या सेलमध्ये मेड इन इंडिया ब्रँड्स आणि शासकीय संचालित एम्पोरियममधून लाखो उत्पादने उपलब्ध केली आहेत. कॉटेज एम्पोरियम, कारागीर, आणि महिला उद्योजकांनी बनवलेले हँडमेड दागिने, बनारसी आणि कांजीवाराम साड्या, हँड मेड कुर्ते, विविध राज्यांतील पारंपरिक पोशाख तसेच घर आणि स्वयंपाकघरातील सजावटीची उत्पादने ग्राहकांना खरेदी करता येऊ शकतील. वाचाः पेटीएमला भारतीय बाजारात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटची टक्कर पाहायला मिळणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने हे फिचर गेल्या वर्षी लाँच केले होते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट लाँच केले आहे. हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) वर आधारीत आहे. ते वापरण्यासाठी अँड्रॉईड आणि IOS वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपचे न्यू अपडेट करावे लागणार आहे. वाचाः व्हॉट्सअप पेमेंट सेटअप कसे कराल? – व्हॉट्सअप ओपन करा, त्यानंतर सेटिंग ऑप्शनमध्ये जा – येथे आपल्याला पेमेंट ऑप्शन दिसेल, यानंतर अॅड पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा – यानंतर तुम्हाला बँक ऑप्शन सेलेक्ट करावे लागेल – बँक सिलेक्ट केल्यानंतर आपला मोबाईल नंबर वेरिफाय करावा लागेल. यासाठी SMS व्हेरीफिकेशन ऑप्शन निवडू शकता – व्हेरीफिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपली बँक डिटेल देय म्हणून जोडली जाईल वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2P8t5fY

Comments

clue frame