कन्फर्म! दोन सेल्फी कॅमेऱ्याचा Vivo S9 5G स्मार्टफोन ३ मार्चला होणार लाँच

नवी दिल्लीः विवोचा नवीन स्मार्टफोनची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. कंपनीने आपला अपकमिंग स्मार्टफोन Vivo S9 5G ची लाँचिंग डेट कन्फर्म केली आहे. कंपनीने चीनची मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. या फोनला ३ मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. फोनच्या फीचर्स संबंधी कंपनीने सध्या कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, लीक झालेल्या रिपोर्टनुसार, याच्या काही वैशिष्ट्ये समोर आली आहेत. वाचाः Vivo S9 5G मिळू शकतात हे फीचर्स गेल्या आठवड्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, फोनला दोन व्हेरियंट मध्ये म्हणजेच ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी आणि १२ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेज मध्ये लाँच करणार आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर आणि ड्यूअल फ्रंट कॅमेरा सेटअप मिळू शकतो. डिझाइनमध्ये हा फोन विवो एस ७ सारखा असू शकतो. कंपनी ९० एचझेडचे रिफ्रेश रेट सोबत ६.४ इंचाचा डिस्प्ले ऑफर करू शकते. डिस्प्ले मध्ये सेल्फी साठी वरच्या बाजुला दोन कॅमेरे दिले जाणार आहेत. यात एक ४४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि दुसरा एक अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळू शकतो. फोनला प्राइमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा असू शकतो. वाचाः या फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 1100 SoC मिळू शकतो. फोन १२ जीबी पर्यंत रॅम आणि अँड्रॉयड ११ आउट ऑफ द बॉक्स ओएस सोबत मिळू शकतो. ३ सी सर्टिफिकेशननुसार, फोनमध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 4000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3shDiF7

Comments

clue frame