Reliance Jio च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय २४० जीबी डेटा आणि फ्री ऑफर्स

नवी दिल्लीः Reliance Jio कडे ४जी डेटा वाउचर, वर्क फ्रॉम होम डेटा पॅक, क्रिकेट पॅक आणि डिज्नी प्लस हॉटस्टार कॅटेगरीत रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास डिज्नी प्लस हॉटस्टार प्लान ऑफर करते. या प्लानमध्ये २४० जीबी पर्यंत डेटा मिळतो. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिओ ग्राहकांना १२०८ रुपयांच्या प्लानमध्ये काय काय ऑफर केले जाते याची सविस्तर माहिती देत आहोत. जाणून घ्या. वाचाः १२०८ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लान जिओच्या १२०८ रुपयांच्या रिचार्ज पॅकची वैधता २४० दिवसांची आहे. म्हणजेच ३० दिवसांची ८ सायकलसाठी हे एक पॅक व्हॅलिड आहे. या पॅकमध्ये एकूण २४० जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना ३० जीबी डेटाचा प्रत्येक सायकलमध्ये वापर करता येऊ शकतो. मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. जिओच्या या डिज्नी प्लस हॉटस्टार पॅकमध्ये कोणत्याही प्रकारची व्हाइस कॉल किंवा एसएमएस बेनिफिट ऑफर केले जात नाही. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा या रिचार्ज पॅकमध्ये फ्री आहे. वाचाः जिओच्या या पॅकचे डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन एक वर्षासाठी फ्री आहे. या पॅकच्या सब्सक्रिप्शनसाठी ३९९ रुपये मोजावे लागतात. जिओकडे १२०८ रुपये, १२०६ रुपये, १००४ रुपये, ६१२ रुपयांचे असे एकूण चार डिज्नी प्लस हॉटस्टार पॅक आहेत. या पॅकची वैधता २४० दिवस, १८० दिवस, १२० दिवस आहे. ६१२ रुपयांच्या प्लान रिचार्जच्या वैधतेसोबत काम करतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uulAjs

Comments

clue frame