Reliance Jio चा स्वस्त प्लान, १२५ रुपयांत महिनाभर अनलिमिटेड कॉलिंग आणि हाय स्पीड डेटा

नवी दिल्लीः Reliance Jio कडे असे अनेक प्लान आहेत जे १५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात. कंपनीने खास जिओ फोन युजर्संसाठी असे दोन प्लान आणले आहेत. ज्यांची किंमत ७५ रुपये आणि १२५ रुपये आहे. या दोन्ही प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी १२५ रुपयांच्या प्रीपेड प्लान संबंधी खास माहिती देत आहोत. जाणून घ्या. वाचाः १२५ रुपयांचा जिओ फोन प्लान जिओचा १२५ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये ०.५ जीबी रोज दिला जातो. म्हणजेच ग्राहकांना एकूण १४ जीबी डेटा मिळतो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर याची स्पीड कमी होऊन ती 64Kbps होते. वाचाः जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलची सुविधा दिली जाते. याशिवाय, कंपनी एकूण ३०० एसएमएस या प्लानमध्ये ऑफर करते. १५० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या प्लान रिचार्ज सोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. म्हणजेच ग्राहकांना जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ म्यूझिक सह अन्य जिओ अॅप्स कोणत्याही शूल्काशिवाय युजर्संना दिले जाते. वाचाः याशिवाय, जिओ फोन युजर्ससाठी १८५ रुपये, १५५ रुपये आणि ७५ रुपयांचा प्लान सुद्धा ऑफर करतो. या सर्व प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग ऑफर दिली जाते. जिओ फोनकडून देण्यात येणारी ही ऑफर प्लान त्याचवेळी काम करतील जेव्हा जिओ सिम जिओफोनमध्ये असेल तेव्हा. त्यामुळे जिओ फोन असलेल्या युजर्संना याचा लाभ घेता येऊ शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3avQsIG

Comments

clue frame