Realme GT 5G ची किंमत उघड, ४ मार्च रोजी लाँच होणार स्मार्टफोन

नवी दिल्लीः रियलमीची नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन ची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. या फोनला पुढील आठवड्यात लाँच करण्यात येणार आहे. कंपनी या फोनला ४ मार्च रोजी चीनमध्ये लाँच करणार आहे. फोनची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या दरम्यान या अपकमिंग स्मार्टफोनची किंमत लीक झाली आहे. रियलमी जीटीची किंमत एका टीजरमधून कंपनीकडून शेयर करण्यात आली आहे. वाचाः रियलमी जीटीची किंमत सांगणारे पोस्टर टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेयर केले आहे. शेयर करण्यात आलेल्या फोटोच्या माहितीनुसार, या फोनची किंमत चीनमध्ये २९९९ चिनी युआन म्हणजेच ३४ हजार रुपये असू शकते. कंपनी या फोनच्या फीचरला खूप प्रमोट करीत आहे. नुकतेच रियलमीने सांगितले होते की, नवीन फोनमध्ये व्हीगन लेदर एडिशन सुद्धा मिळणार आहे. तसेच या रियलमी जीटी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, स्नॅपड्रॅगन चिपसेट आणि नवीन स्टेनलेस स्टील व्हीसी कूलिंग सिस्टम दिले जाणार आहे. वाचाः फोनमध्ये मिळू शकतात हे फीचर्स कंपनी या फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत लाँच करू शकते. प्रोसेसर म्हणून यात स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट मिळू शकतो. डिस्प्ले मध्ये या फोनमध्ये कंपनी 120Hz चे रिफ्रेश रेट सोबत पंच-होल डिजाइनचा AMOLED डिस्प्ले ऑफर करू शकते. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश, सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक डेप्थ मायक्रो लेन्स दिला जाऊ शकतो. कंपनी या फोनमध्ये अँड्रॉयड ११ वर बेस्ड Realme UI 2.0 ऑफर करू शकते. फोनला पॉवर देण्यासाठी यात ६५ वॉटची फास्ट चार्जिंग सोबत 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZOW0rr

Comments

clue frame