Google Meet मध्ये नवे काही खास फीचर्स, विद्यार्थी आणि शिक्षकांना होणार फायदा, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग अॅप युजर्संसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. खास करून विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी करोना काळात डिजिटल एज्युकेशनला प्रोत्साहन देण्यासाठी मीट आणि झूम सारखे अॅप सर्वात मोठे काम करीत आहेत. गुगल मीटच्या डेव्हलपर्सने वेळोवेळी या अॅपमध्ये खूप सारे नवीन फीचर्स आणले आहेत. वाचाः आता गुगलने मीट मध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी Mute All Students, Moderation Tools आणि End Meetings For Everyone सारखे खास फीचर्स जोडले आहेत. लवकरच हे सर्व फीचर्स युजर्संच्या मोबाइलमध्ये सुरू केली जाणार आहेत. याची माहिती लोकांना दिली जाणार आहे. वाचाः मिळणार लाभ वर सुरू असलेल्या मीटिंग दरम्यान अनेकदा आवाज, मीटिंगमध्ये कुणी तर खोड काढतो. तसेच मोडरेटरचे न ऐकणे. ज्यात पार्टिसिपिटला नुकसान होते. आता गुगलने यावर एक उपाय शोधून काढला आहे. याची मदत शिक्षकांना मिळणार आहे. शिक्षक ऑनलाइन क्लास दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना म्यूट करू शकतो. तसेच गरज पडल्यास अचानक मीटिंग संपवू शकतो. यासोबतच मोडरेटिंग टूल्सच्या मदतीने बाकीच्या लोकांना आपले म्हणणे चांगले सांगू शकतो. वाचाः शिक्षकांचा हातात जास्त कंट्रोल गुगलने सेफ आणि सुरक्षित लर्निंग सेशनला लक्ष ठेवण्यासाठी मीट मध्ये नवीन फीचर्स जोडले आहेत. तसेच सिक्योरिटी कंट्रोल टीचर्सच्या हातात दिले आहेत. शिक्षक कुणाला कधीही काढू शकतात किंवा जॉइन करू शकतात. अडवॉन्स सेफ्टी लॉकच्या मदतीने टीचर्सकडे पास मीटिंगशी संबंधित अनेक कंट्रोल येणार आहेत. आता मीटमध्ये नवीन फीचर ला जोडण्यासाठी टीचर क्लास संपवू शकतात. किंवा क्लासमध्ये जास्त आवाज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मीटिंगमधून काढू शकतात. अँड्रॉयड आणि आयओएस युजर्संसाठी लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bivJY3

Comments

clue frame