नागपूरः बँकेच्या व्यवस्थापकालाच सायबर गुन्हेगाराचा गंडा

नागपूर : सायबर गुन्हेगाराने बँकेच्या व्यवस्थापकालाच गंडा घातला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरूद्ध फसवणूक व कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. वाचाः रूपेश माणिकराव धार्मिक (वय ४५ रा. लक्ष्मीनारायणनगर, महाजनवाडी, हिंगणा) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. रूपेश हे रायपूरमधील नवरूप निधी बँकेत व्यवस्थापक आहेत. बँकेत असताना सायबर गुन्हेगाराने त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. पेटीएमचे केवायसी अपडेट करायचे असल्याचे सांगून सायबर गुन्हेगाराने त्यांच्या मोबाइलवर लिंक पाठवली. रूपेश यांनी लिंकमध्ये माहिती भरून गुन्हेगाराला ती परत पाठवली. याचदरम्यान रूपेश यांच्या खात्यातून ४० हजार रुपयांची रक्कम अन्य खात्यात वळती झाली. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pki4EH

Comments

clue frame