या स्मार्टफोन्सवर २५ हजारांपर्यंत सूट, 'या' आहेत टॉप डील्स

नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर Mobiles Bonanza सेलची सुरूवात झाली आहे. २८ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुमच्या पसंतीच्या मोबाइलवर २५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. सेलमध्ये ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रांझॅक्शन वर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर सोबत कंप्लीट मोबाइल प्रोटेक्शन सुद्धा दिला जाणार आहे. जाणून घ्या टॉप डील्स संबंधी. वाचाः LG G8X वर बंपर सूट LG G8X ड्यूअल स्क्रीनचा स्मार्टफोन २०१९ मध्ये लाँच करण्यात आला होता. यावेळी या फोनची किंमत ४९ हजार ९९९ रुपये होती. फ्लिपकार्टच्या मोबाइल बोनांजा सेलमध्ये या फोनला तुम्ही २४ हजार ००९ रुपयांच्या सूट सोबत खरेदी करू शकता. जर तुम्ही ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केले तर हा फोन तुम्हाला २५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर दिला आहे. वाचाः रियलमी ७ जबरदस्त एक्सचेंज ऑफर सेलमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत १७ हजार रुपयांऐवजी १३ हजार ९९९ रुपये झाली आहे. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी ही किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. फोनला एक्सचेंज ऑफर घेतल्यास १६ हजार १५० रुपयांपर्यंत फायदा मिळणार आहे. ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः मोटो G 5G वर जबरदस्त डील स्नॅपड्रॅगन ७५० जी सोबत येणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. सेलमध्ये या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये झाली आहे. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास हा फोन १८ हजार ९९९ रुपये होईल. एक्सचेंज ऑफर मध्ये हा फोन १६ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्स्ट्रा सूट सोबत खरेदी करू शकता. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत या फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः सॅमसंग A21s खरेदीची जबरदस्त संधी सॅमसंगचा हा बजेट स्मार्टफोन २८ फेब्रुवारी पर्यंत १३ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास १ हजार रुपयांची डिस्काउंट मिळेल. एक्सचेंज ऑफर मध्ये या फोनला खरेदी केल्यास १३ हजार ४५० रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये Exynos 850 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. फोनच्या रियरमध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aPLg2y

Comments

clue frame