ऑलवेज-ऑन डिस्प्ले सोबत येऊ शकतो Apple चा iPhone 13 Pro मॉडल

नवी दिल्लीः Apple मॉडल्स लाँच होण्यास अजून बराच वेळ आहे. परंतु, यासंबंधीची माहिती लीक्समधून समोर येत आहे. एका टिप्स्टरच्या माहितीनुसार, आगामी आयफोन १३ प्रो मॉडल्समध्ये ऑलवेज ऑन डिस्प्ले आणि जबरदस्त ग्रिपसाठी रिफाइन्ड मॅट बॅक पॅनेल सोबत येऊ शकते. टिप्स्टरने म्हटले की, डिझाइनमध्ये हा बदल केवळ प्रो मॉडल पर्यंत मर्यादित राहू शकतो. याशिवाय, लेटेस्ट लीक मध्ये हाही दावा करण्यात आला आहे की, नवीन आयफोन मॉडलमध्ये आयपॅड प्रो प्रमाणे १२० हर्ट्ज प्रोमोशन डिस्प्ले दिला जाऊ शकतो. वाचाः EverythingApplePro यूट्यूब चॅनेलने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात आयफोन १३ सीरीज संबंधी नवीन माहिती टिप्स्टरने Max Weinbach हवाल्याने शेयर केली आहे. डिझाइनसंबंधी व्हिडिओत सांगितले की, अॅपल यावर्षी खूपच कमी बदल करणार आहे. iPhone 13 सीरीज डिजाइन मध्ये iPhone 12 सीरीज़ प्रमाणे असू शकते. व्हिडिओ म्हटले की, फोनच्या मागे वापरण्यात आलेले नवीन मॅड मटेरियल आयफोन प्रो १३ मॉडल पकडताना पिक्सल डिव्हाइस फील देऊ शकतो. याशिवाय, व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, अॅपल प्रो मॉडल्स मध्ये LTPO टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. ही टेक्निक अॅपल वॉचमध्ये आधी पाहिली गेली आहे. वाचाः व्हिडिओत सर्वात जास्त ज्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तो म्हणजे ऑलवेज ऑन डिस्प्ले. डिटेल्सच्या माहितीनुसार, ऑलवेज ऑन डिस्प्ले फीचर वर टाइम आणि बॅटरी आयकॉन दिसणार आहे. यातील कोणतीही माहिती अॅपलकडून देण्यात आलेली नाही. ही सर्व माहिती लिक्स कडून समोर आली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LV1IF1

Comments

clue frame